|Thursday, April 18, 2019
You are here: Home » Top News » प्राध्यापकांचे राज्यव्यापी आंदोलन मागे

प्राध्यापकांचे राज्यव्यापी आंदोलन मागे 

 

पुणे / प्रतिनिधी :

विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्राध्यापकांनी राज्यभर सुरू केलेले आंदोलन बुधवारी मागे घेतले. शासनाकडून दोन दिवसांपूर्वी प्राध्यापक संघटनेला सुधारित इतिवृत्त दिले होते. या इतिवृत्तावर चर्चा करून प्राध्यापक महासंघाच्या वतीने बुधवारी संप मागे घेत असल्याचे जाहीर करण्यात आले. गुरुवारपासून प्राध्यापक कामावर रूजू होणार आहेत.

रिक्त जागा भराव्यात, सातवा वेतन आयोग लागू करावा, यांसह विविध मागण्यांसाठी गेल्या पंधरा दिवसांपासून प्राध्यापकांनी कामबंद आंदोलन सुरू केले होते.

Related posts: