|Saturday, December 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » वयोवृद्ध सासूवर सुनेकडून कोयतीचे वार

वयोवृद्ध सासूवर सुनेकडून कोयतीचे वार 

संगमेश्वर आंबवपोंक्षे-कोष्टेवाडीतील घटना, डेरवण रूग्णालयात उपचार सुरू

वृद्धेची प्रकृती चिंताजनक

वार्ताहर /सावर्डे

संगमेश्वर तालुक्यातील आंबवपोंक्षे-कोष्टेवाडीतील सुभद्रा बाळकृष्ण लोकरे (75) यांच्यावर त्यांची सून सुमेधा सुनील लोकरे हिने रागाच्या भरात कोयतीने वार करीत तिला गंभीर जखमी केल्याचा प्रकार मंगळवारी घडला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुभद्रा यांना डेरवण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. शिक्षक मुलाच्या पत्नीने केलेल्या या कृत्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

लोकरे यांच्या डोक्याच्या पुढील दोन्ही बाजूस व दोन्ही हातावर कोयतीने वार करण्यात आले आहेत. सुभद्रा लोकरे यांनी मंगळवारी रात्री 11 वाजता शुद्धीवर आल्यावर पोलिसांसमोर आपली कैफियत मांडली. घरात एकटय़ा राहणाऱया लोकरे यांना दोन मुलगे असून मोठा मुलगा व त्याची पत्नी मुंबईत राहते. तोच त्यांचं पालन पोषण करतो. तर लहान मुलगा सुनील बाळकृष्ण लोकरे हा करजुवे येथे शिक्षक आहे तो पत्नी सुमेधा व मुलांसह सुभद्रा यांच्या शेजारी राहतो.

सुनेकडून वर्षभर मारहाण

दरम्यान, गेले वर्षभर सून सुमेधाकडून मारहाण केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मंगळवारीही त्या घराच्या अंगणात बसल्या असताना मुलगा कामावर गेल्यावर सून सुमेधा हिने धावत येऊन त्यांच्यावर कोयतीने वार केले. अत्यवस्थ अवस्थेत सुनेवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Related posts: