|Thursday, April 18, 2019
You are here: Home » उद्योग » बाजारातील धोक्यामुळे 85 हजार कोटी लटकले

बाजारातील धोक्यामुळे 85 हजार कोटी लटकले 

सरकारच्या कामकाजात आधुनिकता आणण्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला

वृत्तसंस्था/ मुंबई

शेअर बाजारात 75 हून अधिक कंपन्यांचे प्रवर्तक 85 हजार कोटी रुपये उभारण्याच्या प्रक्रियेत होते पण ते आता चिंतेत आहे. चलनवाढीत घट आणि शेअर बाजार घसरल्यामुळे आयपीओ मार्केट बंद आहे. याचा फटका संचार यंत्रणा कंपनी असलेल्या दिनेश इंजिनिअर्सला बसला आहे. गेल्या आठवडय़ात या कंपनीने आयपीओ मागे घेतले होते त्यानंतर कंपनीच्या प्रस्तावाला तिसऱया आणि शेवटच्या दिवशी 17 टक्क्यांपर्यंत सदस्यता मिळाली होती. ज्या कंपन्यांनी सेबीकडून आईपीओ घेण्याची मंजुरी मिळविली होती. त्यांनी आता काही महिन्यांसाठी स्थगिती घेतली आहे, असे व्यापारी बँकांच्या सूत्रांनी सांगितले आहे. शेअर बाजारातील होत असलेल्या चढ-उतार आणि अस्थिरतेमुळे गुंतवणुकदारांना आईपीओमध्ये सहभाग घेत नाहीत.

अर्थव्यवस्थेची आव्हाने आणि स्थानिक समस्येमुळे शेअर बाजारात घसरण होत आहे, त्यामुळेच कंपन्या आईपीओ संबंधी योजना स्थगित करत आहेत, असे आयसीआयसीआयचे सुरक्षा कार्यकारी उपाध्यक्ष रवि सरदाना यांनी सांगितले आहे.  

सर्वकालीन उच्च स्थरावर 29 ऑगस्टला सेन्सेक्स 12 टक्के कमी झाला आहे. यावर्षी 22 आयपीओपैकी 15 स्टॉक्स सध्या त्यांच्या ऑफर किंमतीपेक्षा 6.60 टक्के कमी आहेत. आयसीआयसीआय सिक्युरिटीजने यावर्षी मार्चमध्ये आयपीओकडून 4,017 कोटी रुपये जमविले आहेत. कंपनीचे शेअर्स किंमतीच्या   54 टक्के खाली ट्रेड करत आहेत.  आता 43 कंपन्यांना सेबीकडून आयपीऔ आणण्याची परवानगी मिळाली असून त्या कंपन्या 50 हजार कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहेत.

Related posts: