|Wednesday, April 24, 2019
You are here: Home » उद्योग » शेअर बाजाराची जोरदार उसळी : गुंतवणुकदारांना दिलासा

शेअर बाजाराची जोरदार उसळी : गुंतवणुकदारांना दिलासा 

जवळपास सर्व क्षेत्रांमधील तेजीमुळे निराशेचे मळभ दूर

मुंबई / वृत्तसंस्था

शेअर बाजारामधील घसरणीचे दृष्टचक्र संपल्याचे दिसत आहे. बुधवारी अनेक आठवडय़ानंतर शेअर बाजारानी जोरदार उसळी घेतली असून गुंतवणुकदारांना मोठाच दिलासा दिला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स दिवसअखेर 461.42 अंकानी वधारून 34760.89 अंकावर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी दिवसअखेर 159.05 अंकांनी वर चढून 10460.10 अंकावर बंद झाला. मुंबई शेअर बाजाराच्या मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकामध्येही समाधानकारक वाढ दिसून आली.

आर्थिक संकटात सापडलेल्या एनबीएफसी या संस्थेची जबाबदारी स्टेट बँकेने मोठय़ा प्रमाणावर स्वीकारल्याच्या वृत्ताने गुंतवणुकदाराच्या जीवात जीव आला. स्टेट बँक या संस्थेची 45 हजार कोटी रुपयांची मालमत्ता विकत घेणार आहे. त्यामुळे ही संस्था दिवाळखोरीपासून वाचण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

डॉलरच्या किमतीत किंचितशी घसरण झाल्याने तसेच अमेरिकेच्या रोखे व्यवहाराचा परिणाम समोर आल्याने जागतिक शेअर बाजारांची स्थितीही बुधवारी बऱयापैकी सुधारली. याचा परिणाम भारताच्या शेअर बाजारावरही झाला. विदेशी गुंतवणुकदारानी शेअर बाजारात गुंतवणूक केल्याने उत्साहाचे वातावरण दिसून आले.

बुधवारच्या व्यवहारात बँकिंग क्षेत्राचा निर्देशांक वधारला. बंधन बँकेचे समभाग साडेपाच टक्क्यांनी वधारले. त्याचप्रमाणे ऍक्सीस बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, एस बँक, आदी बँकाचे समभागही तेजीत होते. तसेच इतर क्षेत्रात भारती एअर टेल, एशियन पेंटस्, टाटा स्टील, बजाज ऑटो, एचडीएफसी, एनटीपीसी, एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रिज आणि हिंदुस्थान युनिलिवर या कंपन्यांचे समभाग वधारले.

या उलट टीसीएस, सनफार्मा, विप्रो आणि कोल इंडिया या कंपन्याचे समभाग घसरल्याचे दिसून आले. तथापि ही घसरण कोणताही कल दाखवत नसल्याने निर्धोक आहे असे मत तज्ञानी व्यक्त केले आहे. आगामी काळात बँक क्षेत्र आणि तेल क्षेत्राकडे गुंतवणुकदाराना बारकाईने लक्ष ठेवावे लागणार आहे. तसेच विदेशी गुंतवणूकीचा ओघ कायम राहिल्यास बाजार स्थिरस्थावर होण्याची शक्यता अधिक आहे. असे सांगण्यात येत आहे.

Related posts: