|Friday, November 16, 2018
You are here: Home » Top News » पंतप्रधान मोदी भ्रष्टाचारीच : राहुल गांधी

पंतप्रधान मोदी भ्रष्टाचारीच : राहुल गांधी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

राफेल करारावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आक्रमक झाले असून गुरुवारी राहुल गांधी यांनी थेट नरेंद्र मोदींवरच गंभीर आरोप केले आहेत. नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचारी आहेत. नरेंद्र मोदी हे अनिल अंबानींचे चौकीदार असून त्यांनी सरकारी तिजोरीतील 30 हजार कोटी रुपये अनिल अंबानींच्या खिशात टाकले, अशा शब्दात राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला.

दिल्लीत गुरुवारी राफेल करारासंदर्भात राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर टीका केली. राहुल गांधी म्हणाले, नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधन नाहीत. ते अनिल अंबानींचे पंतप्रधन आहेत. ते अंबानींचे चौकीदार असून त्यांनी सरकारी तिजोरीतील 30 हजार कोटी रुपये अनिल अंबानी यांना दिले. अनिल अंबानी यांना यापूर्वी कधीही विमान निर्मितीचा अनुभव नाही. कराराच्या 10 दिवसांपूर्वी त्यांनी कंपनीची स्थापना केली. अनिल अंबानींवर हजारो कोटी रुपयांचे कर्ज असून अशा व्यक्तीच्या कंपनीला राफेल करारात स्थान देण्यात आले, याकडेही राहुल गांधी यांनी लक्ष वेधले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशीच झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

 

Related posts: