|Saturday, March 23, 2019
You are here: Home » Top News » मि टू इफेक्ट ,अक्षयने रद्द केले ‘हाऊसफुल्ल 4’चे शूटिंग

मि टू इफेक्ट ,अक्षयने रद्द केले ‘हाऊसफुल्ल 4’चे शूटिंग 

ऑनलाईन टीम / मुंबई :

फुल बॉलिवूडमध्ये सध्या ’मी टू’ मोहीमेमुळे खळबळ उडाली आहे. दिग्गज अभिनेत्यांनंतर आता दिग्दर्शक साजिद खान याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाले आहेत. त्याच्यावरील आरोपांनंतर नैतिक जबाबदारी स्वीकारत साजिद खानने ’हाऊसफुल 4’ या सिनेमाचे दिग्दर्शन सोडले आहे. या सिनेमातील अभिनेता अक्षय कुमारने देखील या सिनेमाचं शूटिंग रद्द केले आहे.

 

अभिनेत्री सलोनी चोप्राने हिने देखील दिग्दर्शक – निर्माता सजिद खानवरलैंगिक छळ आणि गैरवर्तनाच्या आरोप केला आहे. 2011मध्ये साजिद खानच्या एका चित्रपटात सलोनी चोप्रानं सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिले होते. त्या दरम्यान साजिदनं गैरवर्तन केल्याचं तिनं जाहीर केलं. यानंतर साजिदनं ट्विट केलं की, ’या आरोपेंच्या पार्श्वभूमीवर माझ्यावर माझं कुटुंब, निर्माते, हाऊसफुल 4 चे कलाकार यांचा दबाव आणि या आरोपांनंतरची नैतिक जबाबदारी म्हणून मी माझ्यावरील आरोप खोटे असल्याचं सिद्ध करत नाही तोपर्यंत या सिनेमाचं दिग्दर्शन सोडत आहे. माझी सर्व मित्रांना आणि माध्यमांना विनंती आहे की सत्य बाहेर येईपर्यंत कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू नका.’

 

Related posts: