|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » Top News » एम जे अकबर यांच्यावरील आरोपांची चौकशी होणार : अमित शहा

एम जे अकबर यांच्यावरील आरोपांची चौकशी होणार : अमित शहा 

ऑनलाईन टीम / मुंबई :

लैंगिक शोषणाच्या तक्रारींमुळे माजी संपादक आणि आताचे परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे.अकबर यांचे मंत्रिपद धोक्मयात आले आहे. अनेक महिला पत्रकारांनी अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. याप्रकरणाची भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी गांभीर्याने दखल घेतली असून अकबर यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. शिवाय, करण्यात आलेल्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे ते पाहणे आवश्यक असल्याचं शहा यांनी म्हटलं आहे. खुद्द अमित शहा यांनीच चौकशीचे आश्वासन दिले असल्याने अकबर यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

 

आतापर्यंत सात महिला पत्रकारांनी अकबर यांच्याविरोधत तक्रारी केल्या आहेत. यापूर्वी बलात्काराच्या आरोपावरुन निहालचंद मेघवाल यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून वगळण्यात आले होते.