|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » बीसीसीआय सीईओ जौहरी वादात

बीसीसीआय सीईओ जौहरी वादात 

मी टू : लैंगिक शोषणाचे आरोप : प्रशासकीय समितीने मागितले स्पष्टीकरण

वृत्तसंस्था/  नवी दिल्ली

 देशभरात सध्या ‘मी टू’ चळवळीने जोर धरला असून भारतीय क्रिकेट नियामक मंडळापर्यंत (बीसीसीआय)  देखील याची व्याप्ती पसरली आहे. एका महिलेने ईमेलच्या माध्यमातून बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राहुल जौहरी यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत.  लेखिका हरनिद्ध कौर यांनी स्वतःच्या ट्विटर खात्यावर काही स्क्रीनशॉट्स प्रसारित करून या महिलेचे म्हणणे मांडले आहे.  सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या प्रशासकांच्या समितीने (सीओए) जौहरी यांना याप्रकरणी एका आठवडय़ात स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे.

2016 मध्ये बीसीसीआयमध्ये दाखल होण्यापूर्वी जौहरी हे डिस्कव्हरी नेटवर्क एशिया पॅसिफिकचे (दक्षिण आशिया) कार्यकारी उपाध्यक्ष होते. त्यांच्यावर एका महिलेने नोकरीच्या बदल्यात अनुचित लाभ उकळल्याचा आरोप केला आहे. लेखिका हरनिद्ध कौर यांनी स्वतःच्या ट्विटर खात्यावर काही स्क्रीनशॉट्स प्रसारित केले आहेत, ज्यात एका महिलेचे म्हणणे नमूद आहे.

नोकरीच्या बहाण्याने गैरवर्तन

डिस्कव्हरी वाहिनीचे अधिकारी असताना त्यांची भेट झाली, ते मला कॉफीसाठी विचारायचे, त्यांना नकार देणे मला अवघड ठरले होते. यानंर त्यांनी मला एकदा नोकरीबद्दल बोलण्यासाठी एका ठिकाणी नेले. त्यांनी याला निवडीचा अंतिम टप्पा  सांगितले होते. मी आज देखील ती घटना विसरू शकलेली नाही. त्या दिवसापासूनच त्या घटनेचा भार मी झेलत असून त्यासाठी स्वतःलाच जबाबदार मानत आहे. नोकरीसाठी संभाषणादरम्यान त्यांनी घरी जाऊया असे सांगितले, त्यांच्या घरी पोहोचलो असता त्यांनी माझ्या येण्याबद्दल स्वतःच्या पत्नीला सांगितले नसल्याचे कळले. त्यांची पत्नी घरात नसल्याचेही त्यांनी मला कळू दिले नाही. स्वतःच्या घरात त्यांनी माझे शारीरिक शोषण केल्याचा दावा महिलेने ईमेलद्वारे केला आहे.

रणतुंगा, मलिंगावरही आरोप

क्रिकेट जगतात मी टू मोहिमेचा तडाखा बसलेले जौहरी हे पहिले भारतीय ठरले आहेत. तर त्यांच्या पूर्वी श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुना रणतुंगा तसेच जलदगती गोलंदाज लसिथ मलिंगा यांच्यावरही लैंगिक शोषण, गैरवर्तन तसेच बलात्काराचे आरोप झाले आहेत. एका भारतीय हवाईसुंदरीने एका हॉटेलमध्ये रणतुंगा यांनी लैंगिक शोषण केल्याच आरोप केला आहे. या महिलेने स्वतःच्या फेसबुक खात्यावर व्यथा मांडली होती. यानंतर हे खाते बंद देखील करण्यात आले होते. तर ट्विटरवर एका पोस्टद्वारे श्रीपदा यांनी एका अज्ञात युवतीचे म्हणणे मांडले आहे. काही वर्षांपूर्वी आयपीएलवेळी मुंबईच्या एका हॉटेलमध्ये मलिंगाने या युवतीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला होता.

Related posts: