|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ‘आप’च्या मंत्र्यांकडून 35 कोटींची रोकड जप्त

‘आप’च्या मंत्र्यांकडून 35 कोटींची रोकड जप्त 

प्राप्तिकर विभागाच्या कारवाईत बेनामी मालमत्तेची कागदपत्रेही ताब्यात

वृत्तसंस्था/ बिलासपूर

प्राप्तिकर विभागाने आम आदमी पार्टीचे (आप) मंत्री कैलाश गहलोत यांच्या निवासस्थानासह कार्यालयावर टाकलेल्या छाप्यात आतापर्यत 35 लाखांची रोकडसह बेनामी मालमत्तेची  कागदपत्रे जप्त केल्याची माहिती शनिवारी सूत्रांनी दिली. गहलोत यांच्यासह त्यांच्या संबंधित कंपन्यांनी कर चुकविल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

 कैलाश गहलोत हे दिल्ली सरकारमध्ये परिवहन मंत्री आहेत. ते बांधकाम व्यवसायाशीही संबंधित आहेत. त्यांच्या दोन कंपन्यांनी कर चुकविल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. बुधवारी सकाळप् प्राप्तिकर विभागाने त्यांच्या निवासस्थानासह 16 कार्यालयांवर छापे टाकले होते. गेली चार दिवस प्राप्तिकर विभागाकडून गहलोत यांच्या मालमत्तेची तपासणी सुरू आहे.  यामध्ये 35 लाखांशी बेहिशेबी रोकड आणि बेनामी मालमत्तेचे कागदपत्रे सापडली आहेत. याबाबत त्यांच्याकडे सखोल चौकशी करण्यात आल्याचे प्राप्तिकर विभागाच्या सूत्रांनी सांगितले. केंद्र सरकारने राजकीय आकसातून ही कारवाई केली असल्याचा आरोप आपचे नेते करत आहेत. शुक्रवारी आपच्या नेत्यांनी गहलोत यांची निवासस्थानी जावून भेट घेतली. गहलोत हे यापूर्वीही वादाच्या भोवऱयात सापडले आहेत. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल केला होता. नियमबाहय़ रित्या लाभाच्या पद घेतलेल्या 20 जणांमध्येही त्यांचा समावेश होता.

Related posts: