|Friday, November 16, 2018
You are here: Home » मनोरंजन » बिग बॉस गाजवणारी सुशांत-आस्तादची जोडी पुन्हा एकत्र

बिग बॉस गाजवणारी सुशांत-आस्तादची जोडी पुन्हा एकत्र 

अभिनेता सुशांत शेलार आणि आस्ताद काळे यांची घनिष्ठ मैत्री बिग बॉस कार्यक्रमात सगळय़ांनीच बघितली. आपल्या बेधडक आणि स्पष्ट वक्तेपणामुळे बिग बॉस कार्यक्रम गाजवल्यानंतर हे दोघेजण पुन्हा एकत्र येत आपला नवा अंदाज प्रेक्षकांना दाखवायला सज्ज झाले आहेत. रंगनील निर्मित मिस्टर ऍण्ड मिसेस लांडगे या आगामी नव्या नाटकातून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शनिवारी या नाटकाचा शुभारंभ वाशीच्या विष्णुदास भावे सभागफहात झाला.

 आपल्या या नव्या नाटय़कृतीबद्दल बोलताना हे दोघं सांगतात की, मिस्टर ऍण्ड मिसेस लांडगे या नाटकाच्या निमित्ताने आम्हाला पुन्हा एकत्र येण्याची संधी मिळाली. वयाचं भान विसरायला लावणारी ही बेभान कॉमेडी निखळ आनंदासोबतच आमच्या भन्नाट टय़ूनिंगची ट्रीट ही प्रेक्षकांना देईल असा विश्वास हे दोघेजण व्यक्त करतात. सुशांत आणि आस्ताद यांसोबत या नाटकात राजेश भोसले, परी तेलंग, मधुरा देशपांडे, रमा रानडे, अमर कुलकर्णी, अलका परब यांच्या भूमिका आहेत. कल्पना विलास कोठारी या नाटकाच्या निर्मात्या आहेत. लेखन सुरेश जयराम तर दिग्दर्शन विजय पेंकरे यांचे आहे.

Related posts: