|Friday, August 23, 2019
You are here: Home » मनोरंजन » सुपर डान्सर महाराष्ट्रमध्ये छोटय़ांची धमाल

सुपर डान्सर महाराष्ट्रमध्ये छोटय़ांची धमाल 

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर चांगलाच गाजलेला सुपर डान्सर हा शो मराठीत आणण्यासाठी सोनी मराठी आता सज्ज झाली आहे. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात, आपल्यात असणाऱया नफत्याच्या कौशल्याला वेळीच खतपाणी मिळालं, तर आयुष्य सोपं होऊन जातं. छोटय़ा उस्तादांमध्ये असणाऱया नफत्यकौशल्याची जाणीव त्यांना करून देऊन महाराष्ट्राच्या सुपर डान्सरचा शोध सोनी मराठीवर घेतला जाणार आहे.

अभिनयाची अचूक जाण असणारे सतीश राजवाडे, आता वाजले की बारा म्हणत रसिकांच्या हृदयाचा ठोका चुकवणारी सुंदर अभिनेत्री-नफत्यांगना अमफता खानविलकर आणि कथा विस्तारावर भर देणारे रिंगण या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचे निर्माते, यंग्राड, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा अशा चित्रपटांची कोरियोग्राफी करणारे विठ्ठल पाटील. हे या शोचे परीक्षक आहे. ही त्रयी सोनी मराठीच्या या शोधमोहिमेत महाराष्ट्रात सापडणारी छोटेखानी कला आपले मापदंड लावून प्रेक्षकांसमोर सादर करणार आहे. आपल्या दिग्दर्शनातून प्रेक्षकांना दर्जेदार चित्रपटांचा गुलदस्ता देऊ करणारे सतीश राजवाडे पहिल्यांदाच रिऍलिटी शोचा भाग होणार आहेत. असा हरहुन्नरी दिग्दर्शक महाराष्ट्रात सापडणाऱया छोटय़ा उस्तादांच्या कलेचं मूल्यमापन करणार म्हणजे महाराष्ट्राच्या विविध भागांत सापडलेले हिरे प्रेक्षकांसमोर येतील आणि डान्सचा सर्वात मोठा स्टेज जिथे डान्सर बनतील सुपर डान्सर हा वाक्याला साजेसा असा हा कार्यक्रम जणू नफत्य प्रेमींसाठी सुद्धा पर्वणीच ठरणार आहे.

सगळय़ांतच एक पाऊल पुढे असणारी महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री अमफता खानविलकर आपल्या अनुभवांच्या गाठोडय़ातून या छोटय़ा नफत्यकलाकारांना युक्तीच्या काय खास गोष्टी सांगणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. त्यात या कार्यक्रमाचे तिसरे परीक्षक, विठ्ठल पाटील कोरिओग्राफरच्या नजरेतून या छोटय़ा कलाकारांचं परिक्षण करणार आहेत. तेव्हा आपापल्या क्षेत्रात तरबेज असणाऱया या त्रयीचं परीक्षण पाहण्यातही एक वेगळीच मजा येणार आहे.

वेगळेपण जपण्याची परंपरा कायम ठेवत सोनी मराठीने आता छोटय़ा उस्तादांचं मूल्यमापन करण्यासाठी एक सुंदर त्रयी रंगमंचावर बसवली आहे. परीक्षक मंडळावर पहिल्यांदाच एकत्र आलेल्या सतीश राजवाडे, अमफता खानविलकर आणि विठ्ठल पाटील यांच्यावर सुपर डान्सर महाराष्ट्र शोधण्यासाठीची जबाबदारी सोनी मराठीने सोपवली असून या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सध्याच्या यंग ब्रिगेडमध्ये मोडणारा अमेय वाघ करणार आहे. 15 ऑक्टोबरपासून सोनी मराठीवर हा कार्यक्रम सुरू होणार आहे.