|Thursday, June 27, 2019
You are here: Home » Top News »  महिलेकडून वारंवार शरीरसुखाची मागणी ; त्रासाला कंटाळून तरूणाची आत्महत्या

 महिलेकडून वारंवार शरीरसुखाची मागणी ; त्रासाला कंटाळून तरूणाची आत्महत्या 

ऑनलाईन टीम / परभणी :

महिलेच्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परभणी येथे घडली आहे. महिला वारंवार शरीरसुखाची मागणी करत असल्याने तरुणाने राहत्या घरी गळफास लावून स्वतःचे जीवन संपवले आहे. पोलिसांना तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

परभणीतील करुणा अपार्टमेंट राहणाऱया तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहिली होती. या चिठ्ठीत त्याने एका महिलेच्या नावाचा उल्लेख केला आहे. संबंधित महिला वारंवार आपल्याकडे शरीरसुखाची मागणी करत असल्याने त्या त्रासाला कंटाळून आपण जीवन संपवत असल्याचे त्याने चिठ्ठीत म्हटले आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.