|Saturday, March 23, 2019
You are here: Home » Top News » सनथ जयसूर्यावर आयसीसीने केले भ्रष्टाचाराचे आरोप

सनथ जयसूर्यावर आयसीसीने केले भ्रष्टाचाराचे आरोप 

ऑनलाईन टीम / पुणे :

श्रीलंकेचा माजी सलामीवीर सनथ जयसूर्यावर भ्रष्टाचाराचे दोन आरोप करण्यात आले आहेत. ICCने या संबधी ट्विट करून हि माहिती दिली आहे. ICCच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने जयसुर्यावर गंभीर आरोप केले असून त्याला स्पष्टीकरण देण्यासाठी 14 दिवसांची मुदत दिली आहे.

 ICCचे भ्रष्टाचारविरोधी पथक जयसूर्याची चौकशी करायला गेले होते. त्यावेळी जयसूर्या श्रीलंकेच्या निवड समितीचा अध्यक्ष होता. त्यावेळी जयसूर्याने आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाला चांगली वागणूक दिली नव्हती. त्यांच्या कारवाईमध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच त्यांना त्याचे काम निःपक्षपातीपणे करू देत नव्हता. त्यामुळे घ्ण्ण्च्या 2.4.6 या कलमानुसार जयसूर्यावर भ्रष्टाचारविरोधी पथकाला मदत न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचबरोबर कलम 2.4.7नुसार कारवाईमध्ये बाधा आणण्याचा आरोपही या ट्विटमध्ये करण्यात आला आहे

Related posts: