|Saturday, March 23, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » भारतातील सर्वोंत्तम कंपन्यांचे सर्वेक्षण : 2018

भारतातील सर्वोंत्तम कंपन्यांचे सर्वेक्षण : 2018 

दरवर्षीप्रमाणे यंदाही देशांतर्गत सर्वोत्तम कंपन्यांचे सर्वेक्षण ग्रेट प्लेस टू वर्क इन्स्टिटय़ूट व इकॉनॉमिक टाइम्स यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येऊन सर्वोत्तम कंपन्या  : 2018 च्या सर्वेक्षणाचा अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे. या सर्वेक्षणाद्वारे कंपनी कर्मचारी या उभयतांच्या संदर्भात बऱयाच महत्त्वाच्या व उल्लेखनीय बाबी स्पष्ट झाल्या आहेत. या सर्वेक्षणात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुमारे 10,000 कंपन्या सहभागी झाल्या होत्या या आकडेवारीवरूनच या सर्वेक्षणाची वाढती लोकप्रियता व व्यापकता लक्षात येते. यावषीच्या भारतातील निवडक व सर्वोत्तम अशा कंपन्यांना हे स्थान प्राप्त होण्यासाठी काय विशेष प्रयत्न करावे लागले व त्याद्वारे त्यांनी कंपनी कर्मचारी या उभयतांना सर्वोत्तम स्थान देण्यासाठी वेगळे असे काय केले ही बाब इतर सर्वांसाठी पण अनुकरणीय असल्याने त्याचा मागोवा घेण्याचा हा संबंधित सर्वोत्तम कंपनीच्या गुणवत्ता स्थानानुरुप हा प्रयत्न-

सर्वोत्तम कंपनी म्हणून प्रथम स्थान मिळविणाऱया एसएपी लॅब्ज इंडिया प्रा. लिमिटेड या कंपनीमध्ये अमलात आणलेल्या विशेष उल्लेखनीय कर्मचारी विषयक उपक्रम म्हणून नवागत कर्मचाऱयांचा योजनाबद्ध सर्व समावेशक परिचय, निवडक कर्मचाऱयांचा वेगाने व गुणात्मक विकास होऊन ते अल्पावधीतच नव्या व आव्हानपर जबाबदारीसाठी तयार करण्यासाठी विशेष मार्गदर्शन व मार्गदर्शकाची योजना ‘सॅप स्टार्टअप सोशल’ या व्यवसाय विषयांना चालना देणाऱया उपक्रमाचे आयोजन करून त्यामध्ये अधिकाधिक कर्मचाऱयांना सहभागी करणे याचा प्रामुख्याने समावेश करण्यात आल्याचे दिसून आले.

 दुसरे स्थान मिळविणाऱया ‘इंटय़ूट इंडिया’ कंपनीतर्फे कर्मचाऱयांसाठी कंपनीच्या जागतिक व्यवसाय विकास केंद्राचे उपाध्यक्ष विजय आनंद हे दररोज अर्धा तास  सहजपणे व आवर्जून उपलब्ध असतात. त्यादरम्यान कंपनीचे कर्मचारी उपाध्यक्षांना अनौपचारिकपणे व मोकळेपणे भेटत असतात. त्या दरम्यान उभयतांमध्ये होणारी चर्चा वैयक्तिक स्तरापासून व्यावसायिक थरापर्यंत विविध प्रश्न आणि मुद्यांवर चर्चा होऊन त्यावर सकारात्मक उपाययोजना होण्याचा महत्त्वाचा फायदा होत असतो. कंपनीने कर्मचाऱयांच्या कर्तव्यपूर्ती व सहकार्यातून कंपनीला व्यवसायवाढीचा पुढील टप्पा गाठण्यासाठी विविध विभाग आणि व्यवसाय क्षेत्रात काम करणाऱया विविध स्तरावरील  कर्मचाऱयांच्या सहभागातून संयुक्त कार्यकारी गट निर्माण केले जातात. या कृतीशील कर्मचारी गटांद्वारा कंपनीच्या व्यवसायाशी संबंधित विविध अडचणींवर मात केली जाते. या उपक्रमाद्वारे कंपनीच्या सर्वच कर्मचाऱयांमध्ये कंपनीच्या व्यावसायिक संदर्भात जबाबदारीसह जागरुकता निर्माण केली आहे.

सर्वोत्तम कंपन्यांमध्ये यावषी तिसरे स्थान मिळविणाऱया अमेरिकन एक्सप्रेस इंडिया कंपनीत कर्मचारी आणि कंपनीत सर्वोत्तम सहकार्य समन्वयाद्वारे कंपनीची व्यावसायिक प्रगती अधिक गतिमान व परिणामकारक करण्यासाठी थँक टँक व कर्मचारी गौरव या दोन नव्या उपक्रमांची सुरुवात करून त्यांची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात आली आहे. यामध्ये थँक टँक अंतर्गत कंपनीच्या ज्या कर्मचाऱयांनी त्यांच्या कामामध्ये विशेष व लक्षणीय कामगिरी केली असेल त्यांच्या कामगिरीची व्यवस्थापनातर्फे दखल घेत त्यांना त्यांच्या कुटुंबीयांसाठी विविधोपयोगी भेट वस्तू दिल्या जातात तर कर्मचारी गौरव महिना अभियानांतर्गत विशिष्ट महिन्यात कंपनीच्या ज्या कर्मचाऱयांनी त्यांच्या नेहमीच्या व चाकोरीबद्ध कामाशिवाय विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावली असेल अशांचे गौरवपूर्ण कौतुक केले जाते. यावषी या विशेष अभियान महिन्यात अमेरिकन एक्स्प्रेच्या 8000 कर्मचाऱयांचा गौरव करण्यात आला हे या संदर्भात उल्लेखनीय आहे.

सर्वेक्षणात पुढील क्रमांक मिळविणाऱया ऍडॉब सिस्टिम्स इंडिया प्रा. लिमिटेडने महिला अधिकाऱयांच्या गुणात्मक विकास आणि प्रगतीसाठी महिला अधिकारी विकास प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी केली आहे. या नव्या उपक्रमाच्या प्रारंभीच्या पहिल्याच वर्षात कंपनीतील 33 महिला अधिकाऱयांनी त्याचा यशस्वीपणे लाभ घेतला असून त्याचा परिणाम त्यांचे कामकाज व कंपनीच्या कामगिरीवर पण सकारात्मक स्वरुपात झालेला आहे.

सर्वोत्तम कंपन्यांच्या क्रमवारीत पुढचा व पाचवा क्रमांक मिळविणाऱया डीएचएल एक्सप्रेस इंडिया लि. या सेवा क्षेत्रातील अग्रणी कंपनीने सर्वोत्तम कर्मचारी विषयक कार्यपद्धतींमध्ये आठवडय़ातील प्रत्येक दिवशी सर्वोत्तम ग्राहकसेवा सातत्याने साधण्यासाठी प्रत्येक आठवडय़ासाठी 1-2-3-4-5-6 या कार्यसंस्कृतीची यशस्वी अंमलबजावणी करतानाच कर्मचाऱयांच्या एकत्रित व सामाजिक कर्मचारी प्रशिक्षणासाठी यूएलडी म्हणजेच युनायटेंड लर्निंग डे या कर्मचारी प्रशिक्षण उपक्रमाची पण जोड दिली.

पहिल्या दहा सर्वोत्तमांच्या यादीत नोंद झालेल्या इतर प्रमुख पाच कंपन्यांच्या कामगिरीच्या संदर्भात विशेषत्त्वाने नमूद करण्याजोग्य बाबी म्हणजे मेरियट हॉटेल्स इंडिया कंपनीने आपल्या व्यवसायवाढीसाठी आवश्यक असणारी बाब अशा जागतिक स्तरावरील विविध देश प्रदेशांची संस्कृती आणि रितीरिवाज व खानपान याची अद्ययावत माहिती आपल्या कर्मचाऱयांसाठी नियमितपणे ‘ग्लोबल कमल्चर क्विझ’ च्या आयोजनाची यशस्वी सुरुवात केली आहे. या शिवाय या सर्वोत्तम कंपन्यांचे कर्मचारी विषयक उपक्रम पण त्यांना सर्वोत्तम बनविण्यासाठी उल्लेखनीय ठरले आहेत. गोदरेज कंझुमर, प्रॉडक्टस लि. ने आपल्या कर्मचाऱयांच्या व विशेषत: युवा व्यवस्थापकांच्या शिक्षण प्रशिक्षणासह त्यांच्या ज्ञानार्जनासाठी कंपनीतर्फे लर्निंग कॅफेची यशस्वी अंमलबजावणी केली आहे. म्युझिक ब्रॉडकास्ट लि. मध्ये आपल्या रेडिओ सिटी स्कूल ऑफ ब्रॉडकास्टिंगमध्ये कंपनीतील कर्मचाऱयांना त्यांच्या मनोरंजन कामाच्या जोडीलाच छंद म्हणून जन प्रबोधनाची संधी उपलब्ध करून दिली आहे. इंटरनॅशनल हॉटेल ग्रुप (इंडिया) प्रा. लि. मध्ये व्यवस्थापनातर्फे कर्मचाऱयांशी सातत्यपूर्ण संवाद साधतानाच त्यांना वेळेत व परिणामकारक प्रतिसाद देण्यासाठी ‘यू सेड इट-वुई डिड इट’ हा उपक्रम नव्यानेच सुरू करून यशस्वी केला आहे. महिंद्र अँड महिंद्र ऑटोमॅटिव्ह अँड फार्म इक्विपमेंट सर्व्हिसेसमध्ये कंपनी कर्मचाऱयांना सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आवर्जून प्रोत्साहित करतानाच व्यवस्थापन कर्मचारी या उभयतांमध्ये सातत्यपूर्ण संवादावरपण भर देण्यात येतो.

कंपनी सर्वेक्षणावर आधारित त्यांच्या सर्वोत्तम नामांकनावर आधारित या अव्वल कंपन्यांचा वानगीदाखल अभ्यास केला असता बदलती व्यावसायिक परिस्थिती, कार्यसंस्कृती, व्यवस्थापनाची ध्येयधोरणे व त्यांना कर्मचाऱयांकडून मिळणारा प्रतिसाद या साऱयांचे प्रतिबिंब या निमित्ताने स्पष्ट झालेले दिसून येते व हेच या सर्वेक्षणाचे मोठे फलित म्हणावे लागेल.

दत्तात्रय आंबुलकर

Related posts: