|Thursday, February 20, 2020
You are here: Home » Top News » ‘सीआयआयआय’ प्रकल्पासाठी सामंजस्य करार

‘सीआयआयआय’ प्रकल्पासाठी सामंजस्य करार 

ऑनलाईन टीम / पुणे :

‘सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन अँड इनक्मयुबेशन (सीआयआयआय)’ या प्रकल्पाच्या उभारणीसाठी टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड (टीटीएल), सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क (एसटीपी) आणि मराठवाडा मित्रमंडळ पुणेदरम्यान त्रिवेणी सामंजस्य करार झाला आहे. सीआयआयआय करारावर स्वाक्षरी करण्याचा समारंभ संस्थेच्या कर्वेनगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात पार पडला.

‘सीआयआयआय’ प्रकल्पासाठी सामंजस्य त्रिवेणी करार

या प्रकल्पाअंतर्गत टेक्नॉलॉजी सेंटर, डोमेन एक्सप्लोरेशन सेंटर आणि ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग सेंटर अशी तीन केंद्रे विकसित केली जाणार आहेत. संशोधन व विकास याबद्दल सल्लामसलत व मार्गदर्शन, नोकरी-अंतर्गत सेवा प्रशिक्षण, कौशल्य विकास व उन्नतीकरण, स्टार्टअपच्या प्रचार व प्रसारासाठी इनोव्हेशन आणि इनक्मयुबेशन यांचा सुयोग्य वापर, चाचणी, प्रमाणीकरण व तत्सम सेवा पुरविणे अशी या प्रकल्पाची उद्दिष्टे आहेत. टाटा टेक्नॉलॉजीज लि., सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क आणि मराठवाडा मित्रमंडळ या तिन्ही संस्था यशस्वी प्रशिक्षणार्थींना संयुक्तपणे प्रमाणपत्र प्रदान करतील. तसेच इनक्मयुबेशन आणि स्टार्टअपसाठी मदत करतील. या करारावर मराठवाडा मित्रमंडळाचे संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव गणगे, टाटा टेक्नोलोजीजचे अध्यक्ष आनंद भदे व सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे डायरेक्टर जनरल डॉ. राजेंद्र जगदाळे यांनी स्वाक्षऱया केल्यात.

‘सीआयआयआय’ प्रकल्पासाठी सामंजस्य त्रिवेणी करार

टाटा टेक्नॉलॉजीज लि.चे आनंद भदे म्हणाले, ‘मराठवाडा मित्र मंडळ आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क, यांच्याशी भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. आमचे इंजिनिअरिंग तज्ञ या प्रकल्पात विद्यार्थ्यांना, नवउद्योजकांना ‘रिअल-टाइम उद्योग अंतर्दृष्टी’ प्रदान करण्यात मदत करतील.

सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे डॉ. राजेंद्र जगदाळे म्हणाले, इतर शैक्षणिक संस्थांसाठी हा प्रकल्प एक आदर्श मॉडेल असेल. हा संयुक्त पुढाकार उच्च-शिक्षणाची कौशल्ये आणि रोजगाराच्या संधी वाढवण्याव्यतिरिक्त नवप्रवर्तनकर्त्यांचे संगोपन करेल आणि अभियांत्रिकी, बायोटेक्नॉलॉजी, कृषी, इलेक्ट्रॉनिक्स इत्यादी क्षेत्रांमधे स्टार्ट-अप्सला पाठबळ देईल.

‘सीआयआयआय’ प्रकल्पासाठी सामंजस्य त्रिवेणी करार

मराठवाडा मित्रमंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव गणगे म्हणाले, ‘टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क सोबतचे हे सहकार्य, व्यवस्थापन, शिक्षकवर्ग, विद्यार्थी, उद्योगजगत आणि विविध नियामक संस्था या पाच स्तंभांना फायदेशीर ठरेल. या प्रकल्पाद्वारे संरचित उपक्रमांमधून कौशल्य वाढविले जाईल’.

Related posts: