|Monday, November 19, 2018
You are here: Home » leadingnews » तांत्रिक मान्यतेची वाट न पाहता शिवस्मारकाचे काम सुरू करा ; सरकारचे L&Tला आदेश

तांत्रिक मान्यतेची वाट न पाहता शिवस्मारकाचे काम सुरू करा ; सरकारचे L&Tला आदेश 

ऑनलाईन टीम / पुणे :

तांत्रिक मान्यतेशिवाय अरबी समुद्रातील शिवस्मारक प्रकल्पाचे काम 19 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे आदेश L&T कंपनीला देण्यात आले आहेत. मात्र प्रत्यक्ष काम 24 ऑक्टोबरला सुरू होणार असल्याची माहिती शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिली आहे.

1 मार्च 2018 पासून 36 महिन्यात काम पूर्ण करण्याच्या सूचना L&T कंपनीच्या कॉन्ट्रक्ट ऍग्रिमेंटमध्ये होत्या. मात्र तांत्रिक समितीची मान्यता नसल्याने स्मारकाचं काम पूर्ण करण्यासाठी साडे सात महिन्यांनी मुदत वाढली. काम सुरू होण्याआधीच स्मारकाची किंमत 643 कोटींनी वाढली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं कंत्राट एल अँड टीकंपनीला देण्यात आलं आहे. प्रकल्पासाठी विविध विभागांकडून एकूण 12 ना हरकत दाखले मिळाले होते. शिवस्मारकाची जागा राजभवनापासून 1.2 किमी, गिरगाव चौपाटीपासून 3.6 किमी आणि नरिमन पॉईंटपासून 2.6 किमी अंतरावर आहे. 6.8 हेक्टर बेटावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा 210 मीटर उंचीचा पुतळा आहे. हा जगातील सर्वाधिक उंचीचा पुतळा असेल असा दावा सरकारकडून करण्यात आला. या स्मारकामध्ये मंदिर, संग्रहालय, रुग्णालय, रायगड किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती आणि शिवाजी महाराजांचे जीवनपट उलगडण्यासाठी थिएटर असेल. आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे यामध्ये पर्यटकांना शिवस्मारक पाहता यावं, यासाठी 180 मीटर उंचीवर जाणारी लिफ्ट असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 24 डिसेंबर 2016 रोजी या स्मारकाच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले होते. पण अजूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. भूमीपूजनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल सी विद्यासागर राव, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे आणि खासदार संभाजीराजे उपस्थित होते.

Related posts: