|Friday, August 23, 2019
You are here: Home » उद्योग » ‘मोटोरोयाल कायनेटिक’कडून सात सुपरबाईक्सची घोषणा

‘मोटोरोयाल कायनेटिक’कडून सात सुपरबाईक्सची घोषणा 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

मोटोरोयाल या कायनेटिक समूहाच्या मल्टी-ब्रँड सुपरबाईक उद्योगातर्फे एका खास प्रसंगी आणखी तीन जागतिक बँड भागीदारींची तसेच सात नवीन सुपरबाईक्सच्या सादरीकरणाची घोषणा करण्यात आली. देशातील पहिली मल्टी-बँड सुपरबाईक उत्पादक असल्यामुळे मोटोरोयाल ही बाईक प्रेमींसाठी एकात्मिक सर्वसमावेशक उपाययोजना बनली असून सुपरस्पोटर्स्, स्ट्रीट नेकेड्स, प्रुझर्स, हिपस्टर्स, ऑफ रोडर्स, टूरर्स आणि अन्य कित्येक मोटार सायकल श्रेणींचे ती भारतात सादरीकरण करणार अ ााहे. यासाठी पहिल्या टप्प्यात भारतातील 6 प्रमुख शहरांत उत्पादनांच्या रिटेल विक्रीसाठी जागतिक दर्जाचे शोरुम उघडण्यात येणार आहे.

कंपनीने मे 2016 मध्ये आपली पहिली बँड भागीदारी एमव्ही ऑगस्टा या आयकॉनिक इटालियन बँडसोबत जाहीर केली, त्यापाठोपाठ नोव्हेंबर 2017 मध्ये दिग्गज ब्रिटीश मोटारसायकल बँड असलेल्या ‘नॉर्टन’ सोबत आंतरराष्ट्रीय संयुक्त उपक्रम घोषित केला. आता मोटोरोयालने एसडब्ल्यूएम, एफबी माँडीयाल आणि हय़ोसंग या आणखी तीन आंतरराष्ट्रीय बँडसोबत आपला सहयोग जाहीर केला आहे.

एसडब्ल्यूएम, एफबी माँडियाल हे दोन्ही इटालियन हेरीटेज बँड असून हय़ोसंग हा दक्षिण कोरिया स्थित बँड आहे. हय़ोसंग कायनेटिक समूहातर्फे सर्वप्रथम भारतात सादर करण्यात आला होता आणि सध्या त्याचे येथे 7000 ग्राहक आहेत. आरामदायीपणा, वेग, गुणवत्ता आणि पैशांचे पुरेपूर मूल्य या गुणविशेषांवर हय़ोसंग गाडय़ांचा पाया आधारलेला आहे.