|Friday, May 24, 2019
You are here: Home » उद्योग » कोळसा आयात 16.4 दशलक्ष टन

कोळसा आयात 16.4 दशलक्ष टन 

वृत्तसंस्था/ सिंगापुर

कोल इंडिया आणि विज निर्मिती केंद्राकडील साठय़ात ऐतिहासिक कमी स्थरावर पोहोचला असून औद्योगिक मागणीत झालेल्या वाढीमुळे कोळशाची आयात यावर्षी 16.4 दशलक्ष टनांवर पोहोचण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यापूर्वी 15.8 दशलक्ष टनाचा अंदाज दर्शविण्यात आला होता. जगातील आघाडी शोध आणि संशोधन कंपनी वूड मैकेन्जीच्या अहवालानुसार येणाऱया काळात भारतीय बाजारात कोळसा आणि विजेच्या किंमतीत मोठय़ा प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच औद्योगिक उत्पादनात सतत होत असलेल्या वृद्धीमुळे मागणीत वाढ होत आहे.

यावर्षी भारताच्या औष्णिक कोळशासाठी आयातीचा अंदाज 15.8 दशलक्ष टनावरून 16.4 दशलक्ष टन करण्यात आला आहे. कारण कोल इंडिया आणि विज निर्मिती केंद्रातील कोळशाचा साठा ऐतिहासिकदृष्टय़ा फारच कमी आहे तर 30 ते 40 लाख टन आणि त्यावरील धोका उचलावा लागण्याची शक्यता आहे असे कंपनीच्या कोळसा संबंधीचे मुख्य विश्लेषक पी भार्गव म्हणाले. तर स्थानिक पातळीवर कोळसा उत्पादन आणि पुरवठय़ात वाढणाऱया मागणीमुळे केवळ एक भाग पूर्ण होऊ शकतो असेही ते म्हणाले.

Related posts: