|Friday, August 23, 2019
You are here: Home » क्रिडा » हॅलेप दुसऱयांदा वर्षअखेरीस अग्रस्थानी

हॅलेप दुसऱयांदा वर्षअखेरीस अग्रस्थानी 

वृत्तसंस्था/ पॅरीस

2018 च्या टेनिस हंगामाअखेर रूमानियाची 27 वर्षीय महिला टेनिसपटू तसेच प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम विजेती सिमोना हॅलेपने डब्ल्यूटीए टूरवरील महिला टेनिसपटूंच्या मानांकन यादीत एकेरीत आपले अग्रस्थान कायम राखले आहे. हॅलेपने सलग दुसऱया वर्षी महिला टेनिसपटूच्या मानांकन यादीतील आपले पहिले स्थान शाबूत ठेवले आहेत.

गेल्या जूनमध्ये 27 वर्षीय हॅलेपने फ्रेंच ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेचे पहिल्यांदा विजेतेपद मिळविताना अमेरिकेच्या स्टिफेन्सचा पराभव केला. हॅलेपने आतापर्यंत या मानांकन यादीतील एकेरीचे अग्रस्थान  40 आठवडे राखले आहे. हॅलेप आता चालू आठवडाअखेरीस होणाऱया मॉस्कोतील स्पर्धेत भाग घेणार आहे.