|Friday, November 16, 2018
You are here: Home » क्रिडा » अर्जेंटिनाचा डेल पोट्रो जखमी

अर्जेंटिनाचा डेल पोट्रो जखमी 

वृत्तसंस्था / ब्यूनोस आयरीस

अर्जेंटिनाचा 30 वर्षीय टेनिसपटू जुआन मार्टिन डेल पोट्रो याच्या उजव्या पायाच्या गुडघ्यातील हाड मोडल्याने त्याला काही दिवस विश्रांती घ्यावी लागणार आहे. शांघाय मास्टर्स टेनिस स्पर्धेत खेळताना पोट्रोच्या उजव्या पायाच्या गुडघ्याला ही दुखापत झाली होती. पोट्रो सध्या पुरूष टेनिसपटूंच्या मानांकन यादीत चौथ्या स्थानावर आहे.

पोट्रोच्या उजव्या पायाच्या गुडघ्यातील हाड मोडल्याने त्याला काही दिवस विश्रांती घ्यावी लागेल. या दुखापतीमुळे पोट्रो आणखी काही दिवस टेनिस क्षेत्रापासून अलिप्त राहील. पूर्ण तंदुरूस्तीनंतर त्याचे लवकरच टेनिस क्षेत्रातील पुनरागमन अपेक्षित आहे.

 

Related posts: