|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » महात्मा बसवेश्वर यांच्या स्मारकासाठी जागा लिंगायत समाजाला द्यावी

महात्मा बसवेश्वर यांच्या स्मारकासाठी जागा लिंगायत समाजाला द्यावी 

प्रतिनिधी/ इचलकरंजी

महात्मा बसवेश्वरांनी 12 व्या शतकांत जाती व्यवस्था नष्ट करून स्त्रियांना बहुजनांना, दलितांना समाजामध्ये समानतेने जगण्याची संधी दिली ते भारतातील लोकशाहीचे पहिले पुरोगामी विचारवंत असून त्यांच्या कार्याचा आढावा घेवून भारतीय लोकशाहीचे मंदीर ‘संसद भवन’ समोर त्यांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारला आहे. अशा थोर संतांचे आचरण करणारे बहुसंख्य जनसमुदाय शहरामध्ये आहेत. बसवेश्वरांचे चिरंतन स्मारक व आश्वारूढ पुतळ्यासाठी लिंगायत सेवाभावी संघाने जय सांगली नाका जवळील जागेची मागणी केली आहे, ती द्यावी अशी मागणी सर्व लिंगायत समाजाच्या वतीने नगरीच्या नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी यांना चंद्रशेखर स्वामी यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.

माझाधर्म-मानवधर्म, माझाधर्म-राष्ट्रधर्म, माझाधर्म-विश्वधर्म व बसवाण्णा धर्मगुरू ही शरणांची दिव्य परंपरा असल्याचे शाहीर मारूती इंगळे व राष्ट्रीय बसव दलच्या सौ. शोभा आवटे यांनी निवेदनाच्यावेळी सांगितले.

यावेळी मुख्याधिकारी दिपक पाटील यांनाही निवेदन देण्यात आले. शहरांत, अनेक मंडळे आहेत पण स्मारकासाठी जागा लिंगायत समाजाला द्यावी अन्यथा आमचा विरोध राहिल असे लिंगायत सेवाभावी संघाचे अध्यक्ष आण्णासाहेब शहापुरे यांनी यावेळी सांगितले.

निवेदनासाठी लिंगायत सेवाभावी संघाचे उपाध्यक्ष बसगोंडा बिरादार, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष आर.के.पाटील, स्नेहबंध फौंडेशनचे शिवगोंडा पाटील, ईराप्पा नागुरे, सदाशिव मिरजे, बाळासाहेब पाटील, शिवलिंग दरीबे, चंद्रकांत आंबी, अरविंद माळी, बाबू दरीबे, शंकर कोरे, सिद्राम कुमुसगी, आप्पासाहेब दरीबे, दंडाप्पा मगदूम, आप्पासो गोकावी, पवन देसाई, दिलीप दरीबे, संजय नागुरे, मल्लिकार्जुन कवळीकट्टी, आप्पा मधाळे, बबन मडीवाळ, शिवलिंग पाटील, सुशिला स्वामी, नंदा येलाजा, सुशिला दरीबे, रंजना बेळवी सह लिंगायत बांधव उपस्थित होते.