|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » सराफच्या दुसऱया शाखांचा पुण्यात शुभारंभ

सराफच्या दुसऱया शाखांचा पुण्यात शुभारंभ 

प्रतिनिधी/सातारा

पुणे-दसरा-दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सर्व पुणेकरांना एक खास पर्वणी म्हणून चंदुकाका सराफ ऍन्ड सन्स प्रा. लि. सुवर्णपेढीतर्फे एकाच दिवशी दोन शाखांचे भव्य उद्घाटन बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी यांच्या हस्ते सातारारोड व पौडरोड, कोथरूड येथे तरूणाईच्या सळसळत्या उत्साहात पार पडले.

उद्घाटनप्रसंगी चंदुकाका सराफ ऍन्ड सन्स प्रा. लि. चेअरमन किशोर शहा, संचालक सिध्दार्थ शहा, आदित्य शहा, नेहा शहा, संगीता शहा आणि शहा-सराफ परिवार तसेच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

सातारा रोड व कोथरूड येथील परिसरातील ग्राहकांच्या  आग्रहास्तव व सोयीसाठी चंदुकाका सराफ सुवर्णपेढीच्या या दोन शोरूम्स अद्ययावत सोयींनी ग्राहकांच्या येत्या सणासुदिला मनपसंत खरेदीकरीता वैविध्यपूर्ण दागिन्यांची भरपूर व्हरायटी घेवून आले आहेत. यामध्ये इनाया फाईन ज्वेलरी कलेक्शन सोने आणि हिऱयांच्या दागिन्यांमध्ये उपलब्ध आहेत. त्याचबरोबर डिल की दिवाली अंतर्गत हिऱयांच्या दागिन्यांच्या खरेदीवर सोने आणि सोन्याच्या खरेदीवर तेवढय़ाच वजनाच्या चांदीची किंमत अगदी फ्री मिळणार आहे. या योजनेचा कालावधी दि. 20 नोव्हेंबर 2018 पर्यंत असणार आहे.