|Saturday, March 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मुस्लिम बांधवांनी केले दौडीचे स्वागत

मुस्लिम बांधवांनी केले दौडीचे स्वागत 

प्रतिनिधी/ बेळगाव

बेळगावात दुर्गामाता दौडीचे स्वागत मुस्लिम बांधवांनी मोठय़ा थाटात केले आहे. सर्वधर्म समभावाची शिकवण देत कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य साजीद शेख यांनी दौडीच्या अग्रस्थानी असणाऱया ध्वजाला हार अर्पण केला. यावेळी दौडीत सहभागी शिवभक्तांना पाणी व फळांचे वाटपही करण्यात आले. आम्ही सर्व जण एक आहोत, एकत्रित सण उत्सव साजरे करुया हीच यामागची भूमिका असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

कॅम्प येथील प्रति÷ित नागरिक राजेंद्र जवळकर यांनी साजीद शेख यांनी आपले काका दावल जंगू शेख यांचा वारसा जपला आहे. असे उद्गार यावेळी काढले. तर किरण निपाणीकर यांनी बोलताना हा उपक्रम सामाजिक सलोखा वाढविणारा असून याबद्दल कौतुक करावे तितके थोडे आहे, अशी भावना व्यक्त केंली. दौडीच्या स्वागतासाठी थांबून दौडीत सहभागी कार्यकर्त्यांसाठी पाण्याची सोय करण्याचा उपक्रम कॅम्प परिसरातील नागरिकांनाही चांगलाच भावला होता.

वाहिद शेख, साबीर शेख, खालीद सनदी, बाशा शेख, श्री काळे, युनुस वाडीकर, महादेव मिरजकर, सुनील सरोदे यांच्यासह असंख्य नागरिक यामध्ये सहभागी झाले होते. भडकल गल्ली येथे इम्तीयाज मेस्त्राr यांनी पुष्पहार अर्पण करुन दौडीच्या स्वागताची परंपरा जपली. सण, वार हे कोणत्याही एका धर्मापूरते निगडीत नसतात. ते साऱया धर्मियांनी एकत्रितपणे साजरे करायचे असतात. राष्ट्रपुरुष आणि देवतांचा आदर्श साऱयांनी जपण्याची गरज आहे. अशी शिकवण बेळगावातील दौड देवू लागली आहे.

Related posts: