|Saturday, March 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » संगणक उताऱयावर पिडीओ आणि सदस्यांत उडाले खटके

संगणक उताऱयावर पिडीओ आणि सदस्यांत उडाले खटके 

प्रतिनिधी/ बेळगाव

 जिह्यासह तालुक्मयातही संगणक उतारा मिळविण्यासाठी मोठय़ा प्रमाणात पैशांची मागणी होत आहे. प्रत्येक ग्राम पंचायतीमध्ये हा गैरकारभार वाढतच आहे. दरम्यान याला कारणीभूत पिडीओ असून काही ग्राम पंचायत सदस्यांचाही त्यात हातभार असल्याचा आरोप करण्यात आला. तालुका पंचायत सदस्य आणि  तालुका पंचायत सदस्य यांची संयुक्त बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीत हा आरोप करण्यात आला.

 यावेळी तालुका पंचायत सदस्य निलेश चंदगडकर यांनी बाळेकुंद्री खुर्द ग्राम पंचायतीच्या पिडीओंना सभागृहात हा सवाल करताच अनेक पिडीओंची पाचावर धारण बसली. एका संगणकीय उताऱयाला किती पैसे लागतात? असा सवाल उपस्थित करण्यात आला. यावेळी सरकारच्या नियमानुसार 50 रुपये लागतात असे त्या पिडीओने सांगितले. मात्र प्रत्येक ग्राम पंचायतमध्ये 5 हजार ते 10 हजार रुपये एका उताऱयासाठी घेण्यात येत आहेत. त्यामुळे ही खऱयाअर्थाने नागरिकांची गळचेपी होत आहे. नागरिकांच्या घामाचा पैसा हे अधिकारी सहज लाटतात. त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी लावून धरण्यात आली. याला बगल देत अध्यक्षांनी चंदगडकरांना शांत करून विषय बदलला.

यावेळी कलखांबच्या सदस्यांनी कलखांब येथे पथदीप नसून याची तक्रार वारंवार करण्यात आली आहे. याचबरोबर गटारीही सुव्यवस्थीत नसून याचा गांभीर्याने  ओळखून हा विषय ग्राम पंचायतीमध्ये मांडण्याची गरज होती. मात्र संबंधित पिडीओ यांनी आपल्याला ग्रामसभा केंव्हा होणार याची माहितीच दिली नाही. त्यामुळे अजूनही काही गल्लींमध्ये अंधार पसरला आहे. याची दखल घेण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी अध्यक्षांनी यापुढे तालुका पंचायत सदस्य, जिल्हा पंचायत सदस्य आणि आमदारांसाठी प्रत्येक ग्राम पंचायतमध्ये एक आसनाची व्यवस्था करण्यात यावी. तसेच यापुढे कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात तालुका पंचायत सदस्यांना खास आमंत्रण देण्यात यावे. कोणतेही भूमिपूजन असो किंवा इतर कार्यक्रम असल्यास तालुका पंचायत सदस्यांना याची माहिती देण्यात यावी. जर यापुढे कोणत्याही पिडीओंनी अशी चूक केल्यास त्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावू, असे सांगितले. त्यामुळे याचा विचार गांभीर्याने करण्याची मागणी झाली.

याचबरोबर सुळेभावी ते मोदगा रस्त्यासंदर्भात तालुका पंचयत सदस्य बसनगौडा पाटील यांनी अध्यक्षांना हा रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी केली. तसेच हा रस्ता सुळेभावीच्या अनेक नागरिकांना सोयीचा असून तो जर दुरुस्ती झाला तर त्याचा फायदा होणार आहे. यासाठी संबंधित विभागाने व तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्षांनी या रस्त्याची पाहणी करावी, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका पंचायत अध्यक्ष शंकरगौडा पाटील होते. उपाध्यक्ष मारुती सनदी, कार्यकारी अधिकारी पद्मजा पाटील, सहाय्यक सचिव मल्लिकार्जुन कलादगी आदी उपस्थित होते..

Related posts: