|Friday, August 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » गर्डरची कमान ठेवण्याचे काम अंतिम टप्यात

गर्डरची कमान ठेवण्याचे काम अंतिम टप्यात 

प्रतिनिधी/ बेळगाव

खानापुर रोड ओव्हरब्रिजचे काम ठरलेल्या वेळेत पुर्ण करण्याच्यादृष्टीने रेल्वे खात्याने कंबर कसली आहे. रेल्वेमार्गादरम्यान गर्डर ठेवण्याचे काम लांबणीवर पडले होते. पण गर्डर तयार करण्याचे काम अंमित टप्यात आले आहे. पण भव्य असे गर्डर कसे ठेवणार याबाबतची उत्सुकता लागली आहे. गर्डर ठेवण्यासाठी विशेष टॅक तयार करण्यात आला आहे.

शहरातील विविध रेल्वे फाटकावर उड्डाणपुल उभारणीचे काम करण्यात येत आहे. आतापर्यत दोन ठिकाणी पुलाचे काम पुर्ण झाले आहे. मात्र खानापुर रोड येथे रेल्वे स्थानकानजीक चार ट्रक असल्याने हा ओव्हरब्रिज मोठा आहे. शहरात सर्वात मोठा ओव्हरब्रिज असून उभारणी करण्यासाठी लोखंडी गर्डरचा आधार घेण्यात येत आहे.124 फुट लांब आणि 30 फुट रूंद आकाराचे गर्डर पुलाच्या दोन्ही मार्गावर  ठेवण्यात येणार आहेत. यापैकी एका बाजूची गर्डर कमान तयार करण्यात आली आहे. गर्डरमध्ये दोन मोठया कमानी करून आडवे गर्डर जोडण्यात आले आहेत. यामुळे सदर गर्डर भव्य बनले आहे. याचा आकार पाहता शहरात पहिल्यांदाच अशा प्रकारचा मोठा ओव्हरब्रिज उभारण्यात येत आहे.  गर्डर भव्य असल्याने रेल्वे ट्रकच्या दरम्यान कसा ठेवणार याबाबतची उत्सुकता शहरवासियांमध्ये वाढली आहे. दिलेल्या मुदतीत ओव्हरब्रिजचे काम पुर्ण करण्यासाठी कामकाज गतीमान झाले आहे.

124 फुट लांब आणि 30 फुट आकाराची भव्य कमाण ठेवण्यासाठी रेल्वे खात्याचे कंत्राटदार रात्रंदिवस व्यस्त आहेत. गर्डरच्या दोन कमान ठेवण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात येणार होता. पण दोन्ही कमानी पुलावर ठेवून आडव्या गर्डरची जोडणी करण्यासाठी वेल्डिंगचे काम करणे अशक्मय आहे. यामुळे रेल्वे मार्गदरम्यान ठेवण्यात येणाऱया गर्डरची कमान बाजूला तयार करण्यात आली आहे. सदर भव्य कमान पेनच्या सहाय्याने उचलून ठेवणे शक्मय नाही. यामुळे गर्डरची कमान ठेवण्यासाठी रोलरचा वापर करण्यात येणार आहे. तसेच पुलाच्या टोकांना जोडण्यासाठी ट्रक तयार करण्यात आला आहे. ट्रकवरून गर्डरची कमान पुलावर ठेवण्यात येणार आहे. ही तयारी पुर्ण झाली असून गर्डरवर स्लॅब घालण्यासाठी आवश्यक तयारीदेखील करण्यात आली आहे. एकाबाजूचे गर्डर ठेवण्यात आल्यानंतर दुसऱया बाजूचे गर्डर तयार करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. येत्या दोन दिवसात गर्डरची कमान ठेवण्यात येणार आहे.