|Saturday, March 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सुवर्ण सिंहासनासाठी होतेय दौडीत मदत

सुवर्ण सिंहासनासाठी होतेय दौडीत मदत 

प्रतिनिधी/बेळगाव

स्वराज्याची राजधानी रायगडावर शिवरायांसाठी 32 मणाचे सुवर्ण सिंहासन उभारण्याचा संकल्प शिवप्रति÷ान हिंदुस्थान संघटनेने केला आहे. यासाठी कर्तव्य निधी म्हणून आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. हा कर्तव्य निधी देण्यासाठी शिवभक्त नागरिक पुढे सरसावू लागले आहेत. दुर्गामाता दौडीत सुवर्ण सिंहासनासाठी मदत देण्याचे प्रमाण वाढत आहे.

सोमवारी झालेल्या दौडीमध्ये महाराष्ट्र एकीकरण समिती महिला आघाडीच्यावतीने माजी उपमहापौर रेणू किल्लेकर यांनी 11 हजार 111 रुपयांचा धनादेश या मोहीमेसाठी सुपूर्द केला. बापट गल्ली येथील कालिकादेवी युवक मंडळ आणि शिवप्रति÷ान हिंदुस्थान कार्यकर्त्यांच्यावतीने एकत्रित 51 हजार रुपयांचा धनादेश सादर करण्यात आला आहे.

आयुर्वेदिक औषधींचे विपेते सुधीर गाडगीळ यांनी स्वतः दौडीमध्ये सहभागी होत 5 हजार 1 रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. तर सीए शिवानंद शहापूरकर यांनी वैयक्तिक स्वरुपात 11 हजार 111 रुपयांचा धनादेश या कार्यासाठी दिला आहे. अनेक जण स्वतःहून पुढे होवू लागले आहेत. नेहमीच सामाजिक उपक्रमात आघाडीवर असणाऱया समर्थनगर येथील कणेरी परिवाराने खास शिवप्रति÷ान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांना आमंत्रीत करुन 11 हजार 111 रुपयांचा धनादेश 32 मण सुवर्ण सिंहासनासाठी दिला आहे.

संपूर्ण देशभरातून सुवर्ण सिंहासन पुर्नसंस्थापना न्यास या संस्थेला कर्तव्यनिधी दिला जात आहे. दौडीत अनेक जण मदत करत आहेत. दरम्यान हा कर्तव्य निधी देवू इच्छिणाऱयांनी प्रत्यक्ष देण्याबरोबरच न्यासच्या खात्यावर हा निधी थेट पाठविण्यास हरकत नाही, अशी माहिती जिल्हा प्रमुख किरण गावडे यांनी दिली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सांगली (आयएफएससी एमएएचबी0000020, खाते क्रमांक 60288981247), बँक ऑफ इंडिया शाखा सांगली (आयएफएससी बीकेआयडी0001609, खाते क्रमांक 160920110000302) येथे आपला निधी थेट पाठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related posts: