|Saturday, March 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » दौडीने जागविली शहर आणि कॅम्पातील पहाट

दौडीने जागविली शहर आणि कॅम्पातील पहाट 

प्रतिनिधी/ बेळगाव

सलग सहाव्या दिवशी हजारोंच्या सहभागातून निघालेली दुर्गामाता दौड लक्षवेधी ठरली. बेळगाव शहर आणि कॅम्प विभागाची पहाट जागवित निघालेल्या या दौडीने नवरात्रोत्सवात शहरातील वातावरणाला खऱया अर्थाने तजेला दिला. जय जय शिवराय आणि जय भवानी जय शिवाजी च्या गजरात सारे वातावरण भगवे करुन सोडले होते. दिवसेंदिवस दौडीत सहभागी होणाऱया तरुणांची संख्या वाढत चालली आहे. सोमवारी मिलीट्री महादेव मंदिर येथील भगवान शिवशंकराचे दर्शन घेऊन दौड निघाली होती.

मराठा लाईट इंन्फंट्रीचे कर्नल बी. एस. घिवारी आणि सुभेदार मेजर उत्तम शिंदे यांच्या उपस्थितीत शिवप्रति÷ाननेच स्थापन केलेल्या शिवतीर्थावरुन दौडीचा प्रारंभ करण्यात आला. शिवप्रति÷ानचे जिल्हा प्रमुख किरण गावडे यांनी लष्करी अधिकाऱयांचे स्वागत केले. यानंतर शिवतीर्थावरील भव्य अशा अश्वारुढ शिवपुतळय़ाचे विधीवत पूजन आणि शिवआरती झाली. अधिकाऱयांच्या हस्ते ध्वज चढविल्यानंतर प्रेरणामंत्र गावून दौडीस प्रारंभ करण्यात आला.

पहाटे पाच पासूनच काँग्रेस रोडवरील  शिवतीर्थावर शिवभक्तांनी जमण्यास प्रारंभ केला होता. ठिक 5.30 वाजता  पहाटेच्या अंधुक प्रकाशात दौडीस प्रारंभ करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या जयघोषात एमएलआयआरसीच्या जवानांनी दौडला सुरुवात केली. कॉंग्रेस रोड, ग्लोब टॉकीज रोड, मार्गे पुढे जाऊन दौड कॅम्प परिसरात गेली. इंडीपेंडन्ट रोड, हायस्ट्रीट, चर्चस्ट्रिट, कल्याण स्वीट मार्ट रोड, गवळी गल्ली, कोर्टस्ट्रीट, वेस्टस्ट्रीट, हायस्ट्रीट कोंडाप्पा स्ट्रीट, चर्चस्ट्रीट, मद्रास स्ट्रीट, कुंतीमाता मंदिर, फिस मार्केट, तेलगु कॉलनी, के. टी. पुजारी, दुर्गामाता मंदिर आदी मार्गे जाऊन पूर्ण कॅम्प परिसर पिंजून काढण्यात आला.

यानंतर खानापूर रोडमार्गे पुढे जाऊन धर्मवीर संभाजी चौक, किर्लोस्कर रोड, रामलिंगखिंड गल्ली, अशोक चौक, बसवाण गल्ली, लक्ष्मी मंदिर, नरगुंदकर भावे चौक, गणपत गल्ली, कडोलकर गल्ली, बुरूड गल्ली, भातकांडे गल्ली, बुरूड गल्ली, मेणसी गल्ली, आझाद गल्ली, टेंगीनकेरा गल्ली, भोई गल्ली, बापट गल्ली, पांगुळ गल्ली, टेंगीनकेरा गल्ली, कामत गल्ली, पी. बी. रोड, मार्केट पोलीस स्टेशन, शेट्टी गल्ली, भडकल गल्ली, कोर्ट कॉर्नर सरदार ग्राऊंड रोड, सन्मान हॉटेल, कॉलेज रोड, यंदे खूट, किर्लोस्कर रोड, कडोलकर गल्ली, बापट गल्ला आदी ठिकाणी जाऊन संयुक्त महाराष्ट्र चौकात सांगता करण्यात आली.

पोलीस उपायुक्त महानिंग नंदगावी, आयुर्वेदिक औषधींचे विपेते सुधीर गाडगीळ आणि सीए शिवानंद शहापूरकर यांच्या हस्ते संयुक्त महाराष्ट्र चौकातील हनुमान मंदिरात आरती व पूजन करण्यात आले. सोमवारच्या दौडीत शहराच्या सर्व भागातील शिवभक्त तरुण, तरुणी आणि महिलांनी सहभाग घेतला होता. संपूर्ण दौडीच्या मार्गावर रांगोळय़ा घालून स्वागत करण्यात आले. तर 32 मण सुवर्णसिंहासनाबद्दल विशेष जागृती करण्यात आली.

बुधवारी येणार शेलार मामांचे वारसदार

आपला पूत्र रायबाचे लग्न बाजुला सारुन आदी कोंढाणा गड सर करण्यासाठी गेलेल्या तानाजी मालुसरेचे शेलारमामा त्याच्या त्या मोहीमेत सहभागी झाले होते. या शेलारमामांचे काही वारसदार बुधवारी बेळगावच्या दुर्गामाता दौडीत सहभागी होणार आहेत. वीर तानाजीच्या आणि त्याला साथ देणाऱया शेलारमामांच्या इतिहासाच्या आठवणी यानिमित्ताने दौडीत जाग्या होणार आहेत, अशी माहिती शिवप्रति÷ान हिंदूस्थानच्यावतीने देण्यात आली.

सहभागी होतच राहणार

दौडीत सहभागी झाले की स्फुरण चेतविले जाते. याचाच अनुभव येत आहे. किर्ती धुडूम या एका तरुणीने आपण सतत या दौडीत सहभागी होतच राहणार आहे, अशी माहिती दिली. दौडीमुळे स्वाभीमान, अभिमान आणि प्रेरणा मिळते. तेंव्हा जास्तीतजास्त तरुणींनी यावे, असे आवाहन तिने केले.

छायाचित्रांच्या माध्यमातून सेवा

स्वतःचा कॅमेरा खरेदी करुन दौड छायाचित्रांच्या माध्यमातून टिपण्याचा उपक्रम कुणाल चौगुले हा तरुण मागील 9 वर्षांपासून करत आहे. त्याने आपल्याला या कामातून आनंद मिळतो आणि दौडीची सेवा होते, अशी भावना व्यक्त केली. पूर्वी कॅमेरा नसताना तो मोबाईलच्या माध्यमातून दौडीची छायाचित्रे काढायचा आता मात्र स्वतःच्या कॅमेऱयातून दररोज न चुकता त्याची ही सेवा सुरु असते.

प्रेरणा देणारी दौड

प्रमोद कंग्राळकर हे दौडीत सहभागी होत आले आहेत. देव, देश आणि धर्माभिमान जागृत करणारी, इतिहासाची साक्ष जागृत करत प्रेरणा देणारी ही दौड आहे, असे त्यांनी सांगितले. आज बेळगावातील दौडीचे स्वरुप भव्य आणि दिव्य होत आहे. याचा त्यांनी अभिमान व्यक्त केला.

बुधवार दि. 17 चा मार्ग

श्री सोमनाथ मंदिर ताशिलदार गल्ली येथून प्रारंभ. फुलबाग गल्ली, पाटील गल्ली, शनिमंदिर रोड, मठ गल्ली, कलमठ रोड, अनंतशयन गल्ली, टिळक चौक, लोकमान्य रंगमंदिर रोड, कोनवाळ गल्ली, अनूपम हॉटेल रोड, कुलकर्णी गल्ली, शेरी गल्ली, शिवाजी रोड, मिनाक्षी हॉटेल क्रॉस, मुजावर गल्ली पहिला क्रॉस, मुजावर गल्ली, कांगले गल्ली, स्टेशन रोड, पाटील गल्ली, फुलबाग गल्ली रोड, ताशिलदार गल्ली, पाटील मळा, भांदुर गल्ली, तानाजी गल्ली पहिला गेट, महाद्वाररोड, तानाजी गल्ली, समर्थ नगर क्रॉस, महाद्वाररोड, कपिलेश्वर मंदिर, कपिलेश्वर ओव्हर ब्रिज, शनि मंदिर येथे सांगता.

Related posts: