|Saturday, March 23, 2019
You are here: Home » उद्योग » गुगलचे सीईओं पिचाईनीं प्रथमच सार्वजनिक ऍप बनवले

गुगलचे सीईओं पिचाईनीं प्रथमच सार्वजनिक ऍप बनवले 

सेन्सर सर्च ऍप बनवण्यात आला : अमेरिकेच्या संसदेने गुगलला प्रोजेक्ट रद्द करण्याची मागणी

वृत्तसंस्था/ सॅन फ्रान्सिस्को

गुगल गुपचुपणे चीनसाठी एक ऍप तयार करत असल्याची चर्चा ऑगस्टमध्ये करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली होती. यात प्रथमच गुगल अशा सार्वजनिक क्षेत्रासाठी ऍपची निमिर्ती करत असल्याची पुष्ठी दिली आहे. ही माहिती अमेरिकेच्या मॅगझीन वायर्ड स्थापना दिनांच्या कार्यक्रम प्रसंगी पिचाई यांनी दिली आहे. चीनसाठी तयार करण्यात आलेले ऍप 99 टक्के प्रश्नाची उत्तरे देण्यास सक्षम असल्याचे स्पष्टीकरणही यादरम्यान पिचाई यांचेकडून दिले गेले.

गुगल नव्याने चीनमध्ये प्रवेश करत असल्याने नव्या ऍपच्या सादरीकरणा विषयी मोठी उत्सुकता होती. त्यामुळे गुगलकडून या ऍपची गुपचुप रचना करण्यात आल्याने अनेक क्षेत्रातून याकडे लक्ष लागून राहिले आहे. 2016 मध्ये घडलेल्या एका घटनेमुळे गुगलवर मोठय़ा प्रामाणात चिखलफेक करण्यात आली होती. आणि चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला होता.

60 वर्षापुर्वी गुगलवर बंदी

चनमध्ये सेन्सॉरशिपच्या कारणामुळे 2010 ला गुगलने सर्च इंजिन आणि युटय़ुब बंद केले होते. त्यावेळी तिथे मार्केट कॅप 30 टक्क्यापेक्षा कमी होता. तर स्थानिक सर्च इंजिन 76 टक्क्यांहून जादा होता. तरी चीनमधील आपले वास्तव्य कधीच पुर्णपणे कमी न करता त्यांनी आपले कर्मचारी आणि कार्यालय चालु ठेवले होते.

चीनमध्ये ऍपच्या लाँचिग विषय प्रश्नचिन्ह

आम्ही चीनमध्ये नवीन ऍप कधी लाँच करणार यासंदर्भात अजूनही प्रशनचिन्ह आहे. तरही बाजारातील विस्तार करण्यासाठी हे ऍप महत्वाचे असल्याचे स्पष्टीकरण पिचाई यांनी दिले.

Related posts: