|Saturday, March 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » नगराध्यक्षांच्या कारची काच फोडली

नगराध्यक्षांच्या कारची काच फोडली 

सावंतवाडीतील घटना : अंधाराची संधी साधत कृत्य : पोलिसात तक्रार

प्रतिनिधी / सावंतवाडी:

सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या पालिकेसमोर उभ्या असलेल्या कारची काच अज्ञाताने सोमवारी रात्री दगड मारून फोडली. रात्री सव्वादहाच्या सुमारास ही घटना घडली. नगराध्यक्ष साळगावकर भटवाडी येथील ओंकार नवरात्र उत्सवाच्या कार्यक्रमात उपस्थित असताना हा प्रकार घडला. घटना घडली त्यावेळी वीजपुरवठा खंडित होता.

दरम्यान, शहरात काम करीत असताना काहीवेळा कुणाची तरी मने दुखावली जातात. कदाचित त्यातून हे कृत्य करण्यात आले असावे. या प्रकरणाचा छडा आता पोलिसांनी छडा लावावा, असे साळगावकर म्हणाले. याबाबत पालिकेच्यावतीने पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. सोमवारी नगराध्यक्ष भटवाडीतील नवरात्रोत्सव कार्यक्रमात उपस्थित होते. त्यामुळे चालकाने कार नेहमीप्रमाणे पालिकेसमोर पार्क केली होती. रात्री दहा वाजता पालिका कर्मचारी गुरुनाथ तावडे यांनी पालिकेचे गेट बंद केले. ते पालिकेतच होते. सव्वादहाच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला. याचवेळी अज्ञाताने या कारच्या मागील काचेवर दगड मारला. त्यात काच फुटली.

घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन माहिती घेतली. मंगळवारी पालिकेचे कर्मचारी गुरुनाथ तावडे, परवीन शेख यांनी तक्रार दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अरुण सावंत, पोलीस कर्मचारी दाजी सावंत, काळसेकर यांनी घटनास्थळी पाहणी केली.  दरम्यान कारची काच फोडण्याच्या घटनेचा पालिका कर्मचारी संघटना, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष, नगरसेवक, विरोधी नगरसेवक, नागरिक यांनी निषेध केला. नगराध्यक्ष साळगावकर म्हणाले, अशा प्रकाराना आपण घाबरत नाही. मी माझे काम सुरूच ठेवणार.

Related posts: