|Friday, November 16, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » संगोळ्ळी रायण्णा ठेवीदारांची पुन्हा जिल्हाधिकाऱयांकडे धाव

संगोळ्ळी रायण्णा ठेवीदारांची पुन्हा जिल्हाधिकाऱयांकडे धाव 

प्रतिनिधी/ बेळगाव

क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा सोसायटीमध्ये गोरगरीब जनतेने रक्कम ठेवली आहे. ही रक्कम देण्यास चेअरमन व संचालक मंडळ टाळाटाळ करत आहेत. त्यांच्यावर अनेक गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तरीही त्यांच्यावर कारवाई होत नाही. यामुळे ठेवीदार वाऱयावर पडले आहेत. आता रक्कम मिळत नसल्यामुळे आम्ही सारेच हतबल झालो असून तातडीने रक्कम परत देण्यासाठी पाऊल उचला, अशी मागणी ठेवीदारांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या सोसायटीमध्ये अनेक निवृत्त कर्मचारी, अधिकारी यांनी मोठी रक्कम ठेवली आहे. याच बरोबर अधिक व्याज मिळत असल्यामुळे कुलीकाम व इतर कामे करणाऱयांनीही ठेव ठेवली आहे. केवळ व्याज अधिक मिळत असल्यामुळे आम्ही ही रक्कम ठेवली आहे. मात्र, आता रक्कम देण्यास चेअरमन व संचालक मंडळ दुर्लक्ष करत आहेत. या सोसायटीच्या सर्वच संचालक मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या सर्वांवर गुन्हे दाखल होऊनही ठेवीदारांची रक्कम देण्यास टाळाटाळ सुरू आहे. रक्कम मिळत नसल्यामुळे आम्ही अडचणीत आलो आहोत. तेव्हा तातडीने रक्कम मिळावी यासाठी आता जिल्हाधिकाऱयांनीच यामध्ये लक्ष घालावे. यापुढे आम्ही रस्त्यावरील लढाई तीव्र करणार असल्याचे यावेळी ठेवीदारांनी सांगितले.

Related posts: