|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Automobiles » उत्सवानिमित्त रेनो कॅप्चर रेंजवर सवलत ; 81 हजारापर्यंत ग्राहकांचा फायदा

उत्सवानिमित्त रेनो कॅप्चर रेंजवर सवलत ; 81 हजारापर्यंत ग्राहकांचा फायदा 

पुणे / प्रतिनिधी :

भारतातील अव्वल युरोपियन ऑटोमोटिव्ह ब्रँड रेनोने कॅप्चर श्रेणीवर आकर्षक किंमत आणि नवीन फीचर्स जाहीर केली आहेत. रेनो कॅप्चरमध्ये आकर्षक प्रेंच डिझाईन, सर्वात रूंद आणि लांब स्वरूप आणि 210 एमएमचा बेस्ट इन क्लास ग्राउंड क्लिअरन्स आहे.

याशिवाय प्रोजेक्टर हेडलॅँप्स, सी-शेप्ड सफायर एलइडी डीआरएल्स, संपूर्ण स्वयंचलित तापमान नियंत्रण कुलिंग वेन्ट्स सहित, युएसबी आणि ऑक्स-इन आणि ब्ल्यूटूथ याची एकत्रित ध्वनी यंत्रणा, पुश बटण स्टार्ट विथ रिमोट सेन्dट्रल लॉकिंग, डय़ूएल एअरबॅग्स, ऍटीलॉक ब्रेकिंग सिस्टम (एबीएस) विथ इलेक्ट्रकि ब्रेक डिस्ट्रिब्यूशन (इबीडी) आणि ब्रेक असिस्ट आणि रेअर डेफॉगर विथ व्हायपर यांचा समावेश होतो. रेनो कॅप्चर पेट्रोल आणि डीझेल पॉवरटेन पर्यायांच्या सहित उपलब्ध असून, 9 लाख 99 हजार 99 पासून याची सुरुवात आहे.