|Friday, August 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पोलिसांवर हल्ला केल्याच्या आरोपातून 8 जण निर्दोष

पोलिसांवर हल्ला केल्याच्या आरोपातून 8 जण निर्दोष 

प्रतिनिधी/ बेळगाव

पोलिसांवर दगडफेक करून त्यांना मारहाण केल्याच्या आरोपातून 8 जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. अन्वर लालासाब मनियार (वय 35, रा. आझादनगर), उमर अब्दुलहमीद दळवाई (वय 32, रा. कोतवाल गल्ली), महम्मदफजल महम्मदगौस पटेल (वय 38), कयुम असीम किल्लेदार (वय 32), इबादुल्ला अब्दुलगणी गवस (वय 24), इजाज जमशेद खान (वय 33, सर्व रा. बागवान गल्ली), शहाबाज बशीरबेग तोडेवाले (वय 24, रा. कोतवाल गल्ली), मुजम्मील इक्बाल डोणी (वय 31, रा. खंजर गल्ली) अशी निर्दोष मुक्तता झालेल्यांची नावे आहेत.

खडक गल्ली, घी गल्ली येथे 28 सप्टेंबर 2015 रोजी रात्री 11.55 वाजता दोन गटांमध्ये वादावादी झाली होती. यावेळी हे सर्व जण हातामध्ये काठय़ा, दगड घेऊन अनेकांच्या घरावर दगडफेक करत होते. यावेळी मार्केटचे तत्कालीन पोलीस निरीक्षक रमेश गोकाक यांनी त्यांना अडविले. मात्र, त्यांनी त्यांच्यावरही दगडफेक करून त्यांचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी पोलिसांनी या सर्वांवर भा.दं.वि. 143, 147, 148, 109, 353, 332, 307, 504 सहकलम 149 आणि केपीडीपी ऍक्ट अन्वये गुन्हा नोंदविला होता.

या खटल्याची सुनावणी पहिले अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयात झाली. त्या ठिकाणी साक्षीदार आणि मुद्देमाल व कागदपत्रे तपासण्यात आली. मात्र, सरकारी पक्षाला त्यांच्यावर गुन्हा साबीत करता आला नाही. महत्त्वाचे म्हणजे सीसीटीव्ही फुटेज न्यायालयात हजर करण्यात आले नाहीत. या कारणामुळे या सर्वांची न्यायाधीश मरळू सिद्धराधय्या यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. या तरुणांच्यावतीने ऍड. शामसुंदर पत्तार, ऍड. हेमराज बेंचण्णावर, ऍड. एस. आर. बाळनाईक आणि ऍड. चिदंबर होनगेकर यांनी काम पाहिले.