|Monday, November 19, 2018
You are here: Home » leadingnews » दसरा मेळाव्यातून मुंडे भगीनींचे शक्ती प्रदर्शन ; पंकजा मुंडेंनी कवितेतून साधला विरोधकांना निशाणा

दसरा मेळाव्यातून मुंडे भगीनींचे शक्ती प्रदर्शन ; पंकजा मुंडेंनी कवितेतून साधला विरोधकांना निशाणा 

ऑनलाईन टीम / बीड :

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणातून नाव न घेतला धनंजय मुंडेंना टोला लगावला आहे. तसेच भगवान बाबांची भक्ती अन् मुंडे साहेबांची शक्ती माझ्या पाठीशी आहे. जोपर्यंत जनतेची ताकद माझ्या पाठीशी आहे. तोपर्यंत मी कशालाच घाबरत नाही, असे म्हणत पंकजा यांनी विरोधक आणि भाजपमधील अंतर्गत विरोधकांवर नाव न घेता निशाणा साधला. तसेच ‘दू दबे पाव चोरी छुपे स न आना, सामने से वार करना, फिर मुझे आजमाना’ असा काव्यात्मक टोलाही पंकजा यांनी आपल्या विरोधकांना लगावला.

यावर्षी प्रथमच बीड जिह्यात आपण दसरा मेळावा घेत आहोत. पण, आज खऱया अर्थाने भगवान बीड जिह्यात बाबांच आगमन झाले आहे. बीड जिह्यात सावरगाव येथे आज भगवान बाबांच्या पुतळय़ाचे लोकार्पण होत आहे. हे पवित्र स्थान आजपासून भगवान भक्तीगड म्हणून ओळखला जाईल असेही पंकजा यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हटले. मुंडेसाहेब हे वाघ होते आणि मी त्यांची कन्या वाघीण आहे. माझ्या रक्ताची हाडामासाची माणसे तुम्ही आहात. त्यामुळे मी कशालाच घाबरत नाही, असे पंकजा यांनी सावरगाव येथील दसरा मेळाव्यात बोलताना म्हटले. मध्यतरी काही सर्वे आले, ज्यामध्ये प्रितमताईंची खासदारकी धोक्मयात, धोक्मयाची घंटा असे काहीही सांगण्यात आले. आम्ही पक्षात चांगल काम करा म्हटले की, हे असले सर्व्हे आले. पण, मी तसले सर्व्हे-फिर्व्हे मानत नाही. तुम्ही, माझी माणसे हीच माझा सर्व्हे आहे, इथ येऊन पाहा, असे म्हणत पंकजा यांनी पक्षांतर्गत असलेल्या विरोधकांना टोला लगावला. पंकजा यांनी यावेळी दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मौत से ठन गई या कवितेतील ओळींच्या माध्यमातून विरोधकांना लक्ष केले. विरोधकांना टोला लगावताना आम्ही कामे करतो, मनोरंजनाचे कार्यक्रम करत नाही. त्यांनी एखादा हौद तरी बांधला का ? असे म्हणत पंकजा यांनी धनंजय मुंडेंवर टीका केली.

 

Related posts: