|Friday, August 23, 2019
You are here: Home » Top News » उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री एन.डी. तिवारी यांचे निधन

उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री एन.डी. तिवारी यांचे निधन 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी यांचे आज दुपारी निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. वृद्धापकाळाने आजारी असलेल्या तिवारी यांच्यावर दिल्लीतील साकेत येथील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू असतांना, तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. एकेकाळचे काँग्रेसचे उत्तर प्रदेशमधील दिग्गज नेते असलेल्या तिवारी यांचा आज जन्मदिन होता. जन्मदिनीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

नारायण दत्त तिवारी यांनी तीन वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषवले होते. तसेच उत्तर प्रदेशचे विभाजन होऊन नव्याने स्थापन झालेल्या उत्तराखंडचे तिसरे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पद भूषवले होते. तसेच 1986 ते 87 या काळात त्यांनी परराष्ट्रमंत्रिपद भूषवले होते. तर 2007 ते 2009 या काळात त्यांनी आंध्र प्रदेशचे राज्यपाल म्हणून काम पाहिले.