|Monday, November 19, 2018
You are here: Home » Top News » आयोध्येत राम मंदिर बांधूनच दाखवा – असदुद्दीन ओवैसी

आयोध्येत राम मंदिर बांधूनच दाखवा – असदुद्दीन ओवैसी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

अयोध्येत राम मंदिराची उभारणी व्हायला हवी. यासाठी सरकारने कायदा करायला हवा, असे विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केल्यानंतर एमआयएमच्या असदुद्दीन ओवैसींनी त्यांना प्रत्युत्तर दिले. आरएसएस आणि त्यांच्या सरकारला अयोध्येत राम मंदिर बांधण्यापासून कोण अडवते आहे. त्यांनी अयोध्येत राम मंदिर बांधून दाखवावे. भाजपाला देशात धार्मिक विविधता नको, त्यांना उदारमतवाद नको. भाजपाला देशात एकाधिकारशाही राबवयाची आहे. त्या पक्षाचा विविधता आणि कायद्यावर विश्वास नाही, असेही ओवैसी म्हणाले.

मागील काही वेळीपूर्वीच संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी राम मंदिरच्या मुद्यावर भाष्य केले होते. त्यानंतर ओवैसींची प्रतिक्रिया आली आहे. सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले होते, राम मंदिराच्या उभारणीसाठी सरकारने कायदा करायला हवा. कोणत्याही मार्गाने राम मंदिराची उभारणी व्हायला हवी.मात्र राम मंदिर बांधले गेले पाहिजे. केंद्रात सत्ता असतानाही राम मंदिराची उभारणी का केली जात नाही, असा प्रश्न लोकांना पडतो, असंदेखील त्यांनी म्हटले. मतदार केवळ एक दिवसाचा राजा असतो. त्यामुळे त्याने नीट विचार करून मतदान करायला हवे. अन्यथा त्या एका दिवसामुळे पाच वर्षे सहन करावे लागतात, असे सरसंघचालक म्हणाले.

Related posts: