|Friday, November 16, 2018
You are here: Home » Top News » एसबीआयच्या माजी प्रमुख अरूंधती भट्टाचार्य रिलायन्स इंडस्टीजच्या संचालकपदी

एसबीआयच्या माजी प्रमुख अरूंधती भट्टाचार्य रिलायन्स इंडस्टीजच्या संचालकपदी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) माजी प्रमुख अरूंधती भट्टाचार्य यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या स्वतंत्र संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने भट्टाचार्य यांची अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्ती केली. भट्टाचार्य यांचे पद हे स्वतंत्र संचालक म्हणून असणार आहे.

भट्टाचार्य यांची नियुक्ती पाच वर्षांसाठी असणार असून भागधारकांनी मान्यता दिल्यानंतर 17 ऑक्टोबर 2018पासून त्यांचा कार्यकाळ सुरु झाला आहे. कंपनीने एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. अरूंधती भट्टाचार्य यांना फायनान्शिअल क्षेत्रात सुमारे 40 वर्षांच्या कामाचा अनुभव आहे. त्या एसबीआयच्या पहिल्या महिला अध्यक्षा होत्या. गेल्याच आठवड्यात क्रिस कॅपीटल या इक्वीटी फर्मने भट्टाचार्या यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती.

Related posts: