|Friday, November 16, 2018
You are here: Home » विविधा » ‘मी-टू’ चळवळ सुरूच राहिली पाहिजे : सुशांत दिवगीकर

‘मी-टू’ चळवळ सुरूच राहिली पाहिजे : सुशांत दिवगीकर 

सुकृत मोकाशी / पुणे :

  • सुशांत दिवगीकरची अपेक्षा, महिलांच्या पेहेरावात सादर करणार ‘सारेगमप’ची गाणी

कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱया लैंगिक अत्याचाराबाबत सुरू असलेली ‘मी-टू’ चळवळ आवश्यकच आहे. ही चळवळ अशीच सुरू राहिली पाहिजे, असे मत एलजीबीटीक्यू समुदायाचा सुशांत दिवगीकर याने ‘तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केले.

एस्सेल व्हिजनची निर्मिती असलेला ‘सारेगमप’ हा कार्यक्रम दर शनिवारी आणि रविवारी रात्री 9 वाजता ‘झी टीव्ही’वर दाखविण्यात येतो. ‘सारेगमप’च्या अख्ख्या सीझनमध्ये सुशांत हा महिलांच्या पेहेरावामध्ये गाणी सादर करणार आहे. या शोच्या प्रमोशनासाठी पुण्यात आला असता त्याने समलैंगिक कायदा, ‘मी-टू’ चळवळ अशा विविध विषयांवर चर्चा केली. सुशांत म्हणाला, कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक शोषण होत असेल, तर त्याचा रिपोर्ट केला पाहिजे. महिलांनी घाबरता कामा नये. त्याचबरोबर त्यांच्यावर कुणीही दबाव टाकता कामा नये. काम हेच आपले ध्येय असायला हवे. पुरावे गोळा करण्यासाठी वेळ लागणारच. ‘मी-टू’ चळवळ ही लोकतंत्राचा भाग आहे. त्यामुळे ती सुरूच राहिली पाहिजे.

समलैंगिक कायदा करण्यासाठी कोणत्याच सरकारने काही केले नाही. आम्हाला सरकारकडून सहानुभूती नको आहे. समलैंगिक कायदा केला, हा चांगला निर्णय आहे. पण, सरकारला हा कायदा करायला उशीर झाला. मन तयार करायला वेळ लागणार आहे. याबद्दल जागृती व्हायला वेळ लागेल. लोक तयार आहेत, पण यासाठी थोडा अजून वेळ लागेल, असेही सुशांतने सांगितले. माझ्या गाण्याची शैली वेगळी आहे. त्यामुळे ‘शो’मध्ये क्लासिकल गाणी गाणे हे माझ्यासाठी आव्हानात्मक ठरणार आहे. सगळे स्पर्धक याचा सराव करतात. पण, माझ्यासाठी हे आव्हान आहे. माझी गाण्याची शैली शास्त्राrय संगीताच्या बेसवर नाही, असेही त्याने नमूद केले.

Related posts: