|Friday, August 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कुडाळला कीर्तन महोत्सवास प्रारंभ

कुडाळला कीर्तन महोत्सवास प्रारंभ 

वार्ताहर / कुडाळ:

 येथील श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ आयोजित अकराव्या श्री देव कुडाळेश्वर कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी रात्री येथील श्री देव कुडाळेश्वर मंदिर येथे श्री स्वामी प्रतिष्ठानचे रणजीत देसाई यांच्या हस्ते झाले.

 गजानन कांदळगावकर, केदार सामंत आणि सावंत-प्रभावळकर कुटुंबियांचे राजू सावंत-प्रभावळकर उपस्थित होते. पुणे येथील मानसी बडवे यांच्या ‘महाराणी पद्मिनी’ कीर्तनाने महोत्सवाचा प्रारंभ झाला. मंडळाचे अध्यक्ष किशोर काणेकर तसेच कार्यकर्ते केदार राऊळ व संतोष विठ्ठल राऊळ यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन उदय वेलणकर यांनी केले.