|Friday, August 23, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » जुलै-सप्टेंबरमध्ये घरांच्या विक्रीत 9 टक्क्यांची वाढ

जुलै-सप्टेंबरमध्ये घरांच्या विक्रीत 9 टक्क्यांची वाढ 

मुंबईत सर्वात जादा 16 टक्के : पुणे दुसऱया स्थानी

नवी दिल्ली : देशातील 7 मोठय़ा शहरातील घराच्या खरेदीत जुलै-सप्टेंबर दरम्यान 9 टक्के नफा झाला आहे. यात सर्वात वरच्या स्थानावर मुंबईचा क्रमाक लागत असून ही वाढ 16 टक्के आहे. तर दुसऱया क्रमाकावर पुण्याचा क्रमाक लागत असून यात 11 टक्के वाढ आहे. ही माहिती एनारॉक प्रॉपर्टीज कन्सल्टींगच्या अहवालात हे आकडे सादर करण्यात आले आहेत. यात बजेटच्या अपार्टमेन्टपेक्षा घराच्या विप्रीत जादाची वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

दिल्ली-एनसीआर आणि हैदराबाद या शहरामध्ये सर्वात कमी घरांची विक्री झाली आहे. ही फक्त 2 टक्के झाली असल्याची नोंद करण्यात आली. सप्टेंबरमध्ये पक्षमास असल्याने अनेक लोकांनी घरांची खरेदी केली नसल्याचे या अहवालात नोंदवण्यात आले आहे.

      घरांची विक्री आणि आकडे

शहर       वाढ(एप्रिल-जून) (जुलै-सप्टेंबर)   (टक्के)

मुंबई…….. 15,750………. 18,200………. 16

पुणे………… 8,375………… 9,300………. 11

बेंगळूर…… 14,800………. 16,250………. 10

चेन्नई………. 2,700………… 2,950………… 8

कोलकाता… 4,025………… 4,300………… 7

हैदराबाद…. 4,750………… 4,850………… 2

एनसीआर                       11,150       11,350          2