|Saturday, March 23, 2019
You are here: Home » उद्योग » भारतात 7 हजारहून जादा करोडपती

भारतात 7 हजारहून जादा करोडपती 

91 टक्के युवकांजवळ 7.4 लाखाहून कमी संपत्ती : जुलै 2017 –

जून, 2018 पर्यंतची आकडेवारी ग्लोबल वेल्थ अहवालात माहिती स्पष्ट  

वृत्तसंस्था/ मुंबई

जुलै 2017 ते जून 2018 या कालावधीत देशातील करोडपतींच्या संख्येत वाढ झाली असल्याची नोंद करण्यात आली आहे. यंदा ही वाढ 7 हजार 300 इतक्या संख्येनी झाली असून यांचा एकूण आकडा 3.43 लाखांवर पोहोचला असल्याची माहिती फायनान्शिअल फर्म क्रेडीट यांच्याकडून जागतिक वेल्थ अहवालातून नोंदवण्यात आली आहे.

सादर करण्यात आलेल्या करोडपतींकडे एकूण  444 लाख कोटी रुपये इतकी संपत्ती असल्याची नोंद करण्यात आली आहे. परंतु भारतातील 91 टक्के युवकांकडे फक्त 7.40 लाख रुपयाहून कमी संपत्ती असल्याची नोंद या अहवालात करण्यात आली आहे.

3 हजार 400 लोकांजवळ 5 कोटी डॉलरहून जादा संपत्ती आहे. तर 1 हजार 500 जणांकडे नेटवर्थ 740 कोटीहून जादा संपत्ती असल्याचीही माहिती समोर आली आहे. 2023 पर्यंत देशात करोडपत्तींच्या संख्येत 53 टक्क्यांनी वाढ होणार असून ही संख्या 5.26 लाखांवर जाणार असल्याचेही म्हटले आहे.

 

Related posts: