|Friday, August 23, 2019
You are here: Home » उद्योग » शेअर बाजारातील घसरण सुरुच

शेअर बाजारातील घसरण सुरुच 

सेन्सेक्स 464 अंकानी घसरला, निफ्टी 10,300 पर्यंत पोहोचला

वृत्तसंस्था/ मुंबई

बाजारातील घसरणीचे सत्र सुरुच असल्याचे दिसून आले गुरुवारी दसऱयानिमित्त बाजार बंदनंतर तो शुक्रवारी सुरु झाला आणि आपले घसरणीचे सत्र त्याने चालुच ठेवले असल्याचे पहावयास मिळाले आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी 1.5 टक्क्यांनी कमजोर होत बंद झाली. व्यवहारात निफ्टी 10,249.6 ने घसरला. सेन्सेक्सची 34,140.3 ने घसरणीची नोंद करण्यात आली. शेवटच्या क्षणी सेन्सेक्स 34,300 जवळपास पोहोचत बंद झाला.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये दबावाचे वातावण दिसून आले. बीएसई मिडकॅपचा निर्देशाकांत 1 टक्क्यांहून जादा घसण झाली. निफ्टी मिडकॅच्या निर्देशाकांत 1.5 टक्क्यांची कमजोरी दिसून आली.

बीएसईच्या प्रमुख 30 कंपन्याचा सेन्सेक्स 464 अंकानी म्हणजे 1.3 टक्क्यांनी घसरत 34,316 वर बंद झाला. एनएसई मुख्य 50 कंपन्यांचा निर्देशाक 150 अंकानी म्हणजे 1.5 टक्क्यांनी घसरत 10,303 वर बंद झाला.

दिवसभरातील व्यवहारात आयटी, माध्यम, ऑटो, खासगी बँका, रियल्टी या कंपन्यांच्या शेअर्समध्ये दबावाचे वातावण पहावयास मिळाले. बँक निफ्टी 0.4 टक्क्यांनी घसरण नोंदवत 25,086 वर पेहोचत बंद झाली. दुसरीकडे एफएमसीजी शेअर्समध्ये खरेदीचे चित्र दिसून आले.

 दिग्गज कंपन्यांमध्ये इंडिया बुल्स, एचसीएल टेक, येस बँक, रिलायन्स, एचडीएफसा। हीरोमोटो, आणि इन्फोसिस यांचे शेअर्स 16.5 ते 3.1 टक्क्यांनी घसरत बंद झाले. सन फार्मा, वेदान्ता, कोटक महिंद्रा बँक. आयटीसी, अदानी पोर्टस,आणि एचयुएल या कंपन्याचे शेअर्स 4 ते 1.2 टक्क्यांनी वधारत बंद झाले.

स्मॉलकॅप शेअर्स मायट्री एच जी इन्फ्रा, जीपीटी आणि इंडियाबुल्स यांचे शेअर्स 16.1 ते 10 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली.