|Saturday, August 24, 2019
You are here: Home » leadingnews » अमृतसर दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी-मुख्यमंत्री अमरिंदर सिंग

अमृतसर दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी-मुख्यमंत्री अमरिंदर सिंग 

ऑनलाईन टीम / अमृतसर :

अमृतसरमध्ये रावणदहनाच्यावेळी झालेल्या अपघाताची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी आज दिले. चार आठवडय़ात ही चौकशी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. यावेळी त्यांनी रेल्वे दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले.

पीडितांच्या कुटुंबीयांसोबत संपूर्ण देश असल्याचे सांगतानाच अशा दुःखाच्या प्रसंगी आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. या अपघातातील केवळ नऊ मृतदेहांची ओळख पटलेली नसल्याचेही त्यांनी सांगितले. या दुर्घटनेतील पीडितांना मदत म्हणून राज्यसरकारने 3 कोटी रूपये दिले असल्याची माहितीही त्यांनी दिली.