|Friday, November 16, 2018
You are here: Home » Automobiles » ‘ऍक्टिव्हा 5जी’देशातील सर्वाधिक विक्री झालेली दुचाकी

‘ऍक्टिव्हा 5जी’देशातील सर्वाधिक विक्री झालेली दुचाकी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारतातले हिरो स्प्लेंडर या दुचाकीचे वर्चस्व कमी झाल्याचे दिसत आहे. होंडा मोटरसायकल ऍण्ड स्कूटर इंडियाच्या (एचएमएसआय) ऍक्टिव्हा स्कुटीची विक्री 2 कोटींच्या वरती गेली आहे. याचबरोबर ऍक्टिव्हा देशातली सर्वाधिक विक्री झालेली दुचाकी बनली आहे. ऍक्टिव्हाने हिरो मोटोकॉर्पच्या स्प्लेंडरला मागे टाकले आहे. याचबरोबर ऍक्टिव्हा जगभरात सर्वाधिक विक्री होणारी दुचाकीही बनली आहे. आम्ही बुधवारी ऍक्टिव्हाच्या 2 कोटी विक्रीचा आकडा गाठल्याचे कंपनीने सांगितले आहे.

1 कोटी दुचाकींची विक्री करण्यासाठी कंपनीला 15 वर्ष लागली. तर दुसऱया 1 कोटीची विक्री फक्त 3 वर्षांमध्येच झाली. लागोपाठ 18 वर्ष वाहनाला सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न केल्याचे हे यश असल्याचे एचएमएसआयचे अध्यक्ष मिनोरू कातू यांनी सांगितले. ऍक्टिव्हाचे आत्तापर्यंत 5 व्हर्जन बाजारात आले.

ऑटो एक्सपो 2018 मध्ये होंडा ऍक्टिव्हाचे नवीन व्हर्जन ऍक्टिव्हा 5G आले होते. स्कूटरला दोन व्हर्जन viz STD आणि DLX मध्ये सादर करण्यात आले. viz STD ची किंमत 52,460 रुपये आणि DLX ची किंमत 54,325 रुपये आहे. कंपनीने या स्कूटरमध्ये अनेक फिचर जोडले. त्यामुळे विक्री वाढली. नवीन होंडा ऍक्टिव्हा 5G मध्ये एलईडी हेडलॅम्प देण्यात आले. ऍक्टिव्हा 5Gला डिजीटल ऍनलॉग इंन्स्ट्रूमेंट क्लस्टर, सर्व्हिस रिमाइंडर इंडिकेटर, 4 इन 1 लॉक सिस्टिम, मोबाईल पॉकेट देण्यात आले. स्मार्ट बटण एकदा दाबल्यामुळे सीट खाली असलेले सामान उघडायला मदत होते. ऍक्टिव्हा 5Gला 109.19 सीसीचे इंजिन देण्यात आले.

Related posts: