|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » चिमुरडीवर बलात्कार करणारा बिहारमध्ये जेरबंद

चिमुरडीवर बलात्कार करणारा बिहारमध्ये जेरबंद 

उत्तर भारतीयांवरील हल्ल्यांसाठी कारणीभूत

वृत्तसंस्था/ बक्सर

 गुजरातच्या साबरकांठा येथे 14 महिन्यांच्या चिमुरडीवर बलात्कार करून फरार झालेल्या आरोपीला बिहारच्या बक्सर येथे अटक करण्यात आली आहे. साबरकांठा येथे 28 सप्टेंबर रोजी मुलीवर बलात्कार करणारा आरोपी बिहारचा असल्याने गुजरातमध्ये उत्तर भारतीय विशेषकरून बिहार आणि उत्तरप्रदेशच्या लोकांवर हल्ले झाले होते. या हल्ल्यांमुळे बिहार आणि उत्तरप्रदेशच्या 8 हजारांहून अधिक जणांनी पलायन केले आहे.

मोबाईल सर्व्हिलान्सच्या आधारावर आरोपी अनिल कुमारला (22 वर्षे) अटक करण्यात आली आहे. बक्सरच्या लोधास गावात शुक्रवारी रात्री गुजरात पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याच्या मुसक्या आवळल्या. बलात्कार केल्यावर अनिलने पलायन करत स्वतःच्या गावात आश्रय घेतला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

बलात्काराच्या घटनेमुळे संतप्त गुजरातच्या लोकांनी उत्तर भारतीयांवर हल्ले केले होते. या हल्ल्यांप्रकरणी पोलिसांनी सुमारे 450 जणांना अटक केली होती. काँग्रेस आमदार अल्पेश ठाकोर याच्या संघटनेने उत्तर भारतीयांवर हल्ले केल्याचे तपासात आढळले होते.

घटनेवर एक नजर

सूरतच्या लिम्बायत गोडाद्रान येथे 14 महिन्यांच्या चिमुरडीचा मृतदेह मिळाला होता. ही मुलगी 2 दिवसांपासून बेपत्ता होती. या मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची 10 पथके तैनात करण्यात आली होती. मुलीच्या घराखालील एका खोलीत प्लास्टिक बॅगमध्ये तिचा मृतदेह आढळला होता. घराशेजारी राहणारा अनिल यादवने हे कृत्य केल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला होता. या घटनेपासूनच अनिल फरार होता.

Related posts: