|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सूर्याच्या किरणांप्रमाणे विवेकानंदाचे विचार प्रखर

सूर्याच्या किरणांप्रमाणे विवेकानंदाचे विचार प्रखर 

बेळगाव / प्रतिनिधी

सूर्याची किरणे ज्याप्रमाणे सर्वांना प्रकाश देतात त्याप्रमाणे स्वामी विवेकानंद यांचे विचार समाजाला जीवनाचा प्रकाश देत असतात. त्यांच्या विचारांमधून एक आदर्श निर्माण केला आहे. जीवनात अनेकवेळा दु:खे येतात, संकटे येतात. त्यातून तारुण नेण्याचे सामर्थ्य विवेकानंदांच्या विचारांमध्ये आहे, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त डी. सी. राजप्पा यांनी केले.

शिकागो येथे झालेल्या धर्मपरिषदेत विवेकानंदांनी केलेल्या भाषणाला 125 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देशभर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहेत. युवा ब्रिगेडतर्फे हा असाच एक कार्यक्रम बेळगावमध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमावेळी डी. सी. राजप्पा हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी दावणगेरी येथील रामकृष्ण आश्रमाचे प्रमुख योगेश्वरनंदजी महाराज, बेळगाव रामकृष्ण आश्रमाचे प्रमुख आत्मप्रकाशानंदजी महाराज, युवा ब्रिगेडचे प्रमुख चक्रवर्ती सुलीबेले व युवा खेळाडू शितल कोल्हापूरे उपस्थित होती.

यावेळी बोलताना चक्रवर्ती सुलिबेले म्हणाले, राज्याबरोबरच गोवा व केरळ राज्यांमध्ये विवेकानंदांची रथयात्रा काढण्यात आली. पंरतु बेळगावइतके सुंदर व भव्य स्वागत दुसरे कुठे झाले नाही. बेळगावमध्ये विवेकांनदांचे विचार रूजल्याने येथील लोकांना त्यांची माहिती आहे. ज्याप्रमाणे पाणी दिल्यानंतर रोपाला अंकुर फुटतो त्याप्रमाणे विवेकानंदांचे विचार भक्तांना मिळाल्यानंतर जीवनात आशेचे अंकुर फुटतात, असे त्यांनी सांगितले.

त्यानिमित्त शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. लिंगराज कॉलेजच्या मैदानापासून या रॅलीला सुरुवात होवून कॉलेज रोड, चन्नम्मा चौक, आरटीओ चौक, सम्राट अशोक चौक मार्गे किल्ला येथील रामकृष्ण आश्रमात या रॅलीची सांगता झाली. या रॅलीच्या मध्यभागी रथ ठेवण्यात आला होता. यामध्ये बेळगाव परिसरातील मोठय़ा संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता

Related posts: