|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » पोलीस स्मृतीदिनानिमित्त हुतात्म्यांना श्रद्धांजली

पोलीस स्मृतीदिनानिमित्त हुतात्म्यांना श्रद्धांजली 

ऑनलाईन टीम / पुणे :

पोलीस स्मृतिदिनानिमित्त गेल्या वर्षभरात कर्तव्य बजावत असताना हुतात्मा झालेल्या 416 पोलीस अधिकारी व कर्मचाऱयांना रविवारी सकाळी पाषाण येथील पोलीस संशोधन केंद्रात श्रद्धांजली वाहण्यात आली. यात महाराष्ट्रातील पोलीस हवालदार सुनिल दत्तात्रय कदम, सुरेश दत्तात्रय गावडे आणि पोलीस काँस्टेबल सतीश श्रद्धाराव मडवी यांचा समावेश आहे. यावेळी ज्ये÷ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

शिवाय, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे, निवृत्त पोलीस अधिकारी व्ही. जी. वैद्य, के. के. कश्यप, प. सु. नारायण स्वामी, अजित पारसनीस, सुधाकर आंबेडकर, अशोक धिवरे, वसंत कारेगांवकर, ए.डी. जोग, सुरेश खोपडे तसेच सर्व वरि÷ पोलीस अधिकारी उपस्थित होते. 1 सप्टेंबर 2017 ते 31 आॅगस्ट 2018 या कालावधीत देशातील सर्व राज्यात पोलीस दलाचे पोलीस अधिकारी व जवान असे 416 जणांनी आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आले. अशा सर्वांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी कवायतीचे नेतृत्व सहायक पोलीस आयुक्त गणेश गावडे आणि पोलीस निरीक्षक सदाशिव तांबडे यांनी केले.