|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कवितेचा प्रत्येक शब्द जबाबदारीने लिहायला हवा

कवितेचा प्रत्येक शब्द जबाबदारीने लिहायला हवा 

कोजागरी कवी संमेलनात रफिक सूरज यांचे प्रतिपादन

मी सुमारे 25 वर्ष कविता लिहित आहे. परंतु आजही माझी भावना मला अजून चांगली कविता लिहिता आली नाही, अशीच आहे. -रफिक सूरज, कवी

प्रतिनिधी / सावंतवाडी:

आजच्या समकालीन मराठी कवितेत चांगली कविता लिहिणाऱयांची संख्या वाढते आहे. यात तळकोकणातील कवींचे योगदान महत्वपूर्ण असे आहे. कवी-कलावंताने आपली लेखनकला चिकित्सकपणे तपासत पुढचे लेखन करायला हवे. स्वतःच्याच लेखनाचे आत्मपरीक्षण केले गेले नाही तर मागच्या पिढीपेक्षा वेगळे लेखन करता येणार नाही. त्यामुळेच कवीकडून कवितेचा प्रत्येक शब्द जबाबदारीने लिहिला गेला पाहिजे, असे प्रतिपादन नामवंत कवी प्रा. रफिक सूरज यांनी येथे केले. सिंधुदुर्ग साहित्य संघाच्या 47 व्या कोजागरी कवी संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.

श्रीराम वाचन मंदिराच्या केशवसुत सभामंडपात प्राचार्य एच. व्ही. देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग साहित्य संघाचे अध्यक्ष तुकाराम नाईक, कार्याध्यक्ष प्रा. प्रवीण बांदेकर, ज्ये÷ कवी दादा मडकईकर, प्रा.गोविंद काजरेकर, वीरधवल परब, प्रा. सुमेधा नाईक, प्रा. केदार म्हसकर, प्रा. शरयू आसोलकर, उषा परब, मधुकर मातोंडकर, प्रा. जी. ए. बुवा, प्रभाकर भागवत, डॉ. अनिल धाकू कांबळी, विठ्ठल कदम यांच्यासह अनेक साहित्यिक उपस्थित होते. यावेळी कवी दादा मडकईकर यांनी वयाची सत्तरी पूर्ण केल्याबद्दल  त्यांचा प्राचार्य देशपांडे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी लीलाधर घाडी यांच्या ‘छान छान पिल्लू’ या बाल काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्रा. सूरज यांच्या हस्ते करण्यात आले.

कवितेचा महोत्सव व्हावा!

प्रा. सूरज म्हणाले, एखादी साहित्य चळवळ सुमारे अर्धा शतक अखंडितपणे चालू राहावी, ही तशी सोपी गोष्ट नाही. सिंधूदुर्ग साहित्य संघ चळवळ वसंत सावंत यांच्यासारख्या कवितेवर नि÷sने प्रेम करणाऱया व्यक्तीमुळे सुरू राहिली. यामुळे तळकोकणने मराठीला महत्वाचे कवी दिले. साहित्य संघाच्या या कार्याची नोंद वेगळीच घ्यायला हवी. अजून तीन वर्षांनी साहित्य संघ पन्नाशी गाठेल. यावेळी कवितेचा महोत्सव भरविला जावा. मी सुमारे 25 वर्ष कविता लिहित आहे. लौकिक अर्थाने कवितेचे यशही मिळाले असेल. परंतु आजही माझी भावना मला अजून चांगली कविता लिहिता आली नाही, अशीच आहे. आपल्या नम्रतेमुळेच उद्याची अधिक चांगली कविता लिहिण्याची शक्मयता निर्माण होते. आमच्या मागून येणाऱया पिढीने कविता लेखनाचे हे भान जपणे आजच्या काळात अधिक गरजेचे झाले आहे.

प्राचार्य देशपांडे म्हणाले सिंधुदुर्ग साहित्य संघाच्या जडण-घडणीतील मी एक असल्याने आज खूप वर्षाने साहित्य संघाच्या व्यासपीठावरून बोलतांना मला आनंद होत आहे. वसंत सावंत हे मराठीतील एक प्रमुख कवी माझे इथले सहकारी होते. त्यांच्या कल्पनेतून त्यावेळी दक्षिण साहित्य संघाची स्थापना झाली. संघाचा सर्व व्यवहार तेव्हा मी पाहत असे. इथल्या ढोलकाठीवर सायंकाळी आमच्या साहित्य संघाच्या बैठका व्हायच्या. अनवाणी फिरणाऱया त्यावेळच्या कवींसाठी हा साहित्य संघ सुरू करण्यात आला आणि बघता बघता या साहित्य संघामुळे अनेकांना लिहिण्याची प्रेरणा मिळाली.

तुकाराम नाईक म्हणाले, वसंत सावंत यांच्याबरोबरच एच. व्ही. देशपांडे यांचे योगदान साहित्य संघात आहे. त्यावेळचा सगळाच काळ साहित्य संघाच्या आम्हा सगळय़ा सहकाऱयांचा भारावलेला असा होता. आज या मंचावर देशपांडे यांना पाहून मला ते सारे दिवस आठवताहेत.

साहित्य संघाचे मोठे योगदान!

प्रा. बांदेकर म्हणाले, गेली 47 वर्षे साहित्य संघाचा कोजागरी काव्य उत्सव अखंडपणे सुरू आहे. साहित्य संघाच्या या संमेलनाला विंदा करंदीकर, बा. भ. बोरकर मंगेश पाडगावकर अशा अनेक दिग्गज कवींबरोबर माझ्या समकालीन पिढीतील अनेक महत्त्वाच्या कवींनी अध्यक्ष म्हणून सहभाग नोंदवला. यातूनच कोकणच्या साहित्य चळवळीत साहित्य संघाचे योगदान लक्षात येईल. त्याकाळी गारगोटी, गोवा, रत्नागिरी अशा दूरदूरच्या भागातून नवे कवी या संमेलनात सहभागी होऊन आपले कविता वाचन करायचे.

यावेळी कवी मडकईकर यांनी आपल्या कवितेच्या जडणघडणीत सिंधुदुर्ग साहित्य संघ आणि कविवर्य वसंत सावंत यांचे योगदान महत्त्वाचे असल्याने साहित्य संघाने आज केलेल्या या सत्काराचा मला विशेष आनंद होत असल्याचे सांगितले.

यावेळी नव्या-जुन्या कवींनी कविता सादर केल्या. सुमेधा नाईक यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. काजरेकर यांनी आभार मानले. संमेलनात सिंधुदुर्ग जिल्हय़ाच्या विविध भागातून बहुसंख्येने कवी सहभागी झाले होते.

Related posts: