|Monday, August 26, 2019
You are here: Home » Top News » रागाच्या भरात पत्नीचा गळा घोटून मृतदेहाशेजारी तो रात्रभर बसला

रागाच्या भरात पत्नीचा गळा घोटून मृतदेहाशेजारी तो रात्रभर बसला 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

मध्य दिल्लीच्या कमला मार्केट परिसरात एका पतीने त्याच्या पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पती तब्बल 24 तास पत्नीच्या मृतदेहाशेजारीच बसून होता. यानंतर त्याने पोलीस स्टेशन गाठले आणि गुन्हय़ाची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

कमला मार्केट परिसरात राहणाऱया कामिलचे शुक्रवारी त्याची पत्नी रेश्माशी भांडण झालं. यानंतर कामिलने रेश्माची गळा आवळून हत्या केली. तो रात्रभर रेश्माच्या मृतदेहाशेजारी बसून होता. या दरम्यान त्याने तिचा मृतदेह पुरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात अपयशी ठरल्यावर तो मृतदेहाजवळच बसून राहिला. आपल्या घरात सर्व काही ठिक आहे, हे दाखवण्यासाठी तो शनिवारी पत्नीच्या माहेरीदेखील जाऊन आला. जवळपास 24 तास पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून आलेला कामिल त्यानंतर कमला मार्केट पोलीस स्टेशनला गेला. तिथे त्यानं पोलिसांना या घटनेची माहिती दिली. शुक्रवारी कामिलचं पत्नी रेश्माशी भांडण झालं. त्यानं रागाच्या भरात तिला मारहाण केली. त्यानंतर त्याने गळा आवळून रेश्माची हत्या केली, अशी माहिती डीसीपी एम. एस. रंधावा यांनी दिली. ‘कामिल त्यावेळी मद्यधुंद अवस्थेत होता. रेश्माच्या दोन मित्रांविषयी त्याच्या मनात संशय होता. याबद्दल चौकशी करत त्याने तिला मारहाण केली. त्यानंतर त्याने 2 वर्षांच्या मुलासमोरच रेश्माची हत्या केली. तो रात्रभर मुलासोबत रेश्माच्या मृतदेहाशेजारी बसला होता,’ अशी माहिती रंधावा यांनी दिली.