|Saturday, March 23, 2019
You are here: Home » Top News » सीबीआयच्या विशेष संचालकांवर तीन कोटींची लाच घेतल्याचा आरोप

सीबीआयच्या विशेष संचालकांवर तीन कोटींची लाच घेतल्याचा आरोप 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

सीबीआयने आपलेच विशेष संचालक आणि क्रमांक दोनचे अधिकारी राकेश अस्थाना यांच्यावर तीन कोटींची लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाला क्रमांक एक आणि क्रमांक दोनचे अधिकारी असा वाद असल्याचेही बोलले जात आहे. सीबीआयचे टॉप बॉस आलोक वर्मा आणि अस्थाना यांच्यातील वादाची किनार या प्रकरणाला असल्याची चर्चा आहे.

सीबीआयने अस्थाना यांच्यावर दाखल केलेल्या एफआयआरनुसार, अस्थाना यांनी मांस व्यापारी मोईन कुरेशीकडून तीन कोटींची लाच घेतल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे अस्थाना हेच कुरेशीविरोधात सुरु असलेल्या प्रकरणाचा तपास करत होते. अस्थाना यांनी स्वतःवरील आरोप फेटाळत यामध्ये आपल्याला फसवले जात असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. हैदराबादमधील उद्योगपती सतीश बाबू सना यांच्या तक्रारीवरुन सीबीआयने आपल्या संस्थेतील दुसऱया क्रमांकाच्या अधिकाऱयावर लाच घेतल्याचा ठपका ठेवला आहे. अस्थाना यांना गेल्या वषी जवळपास तीन कोटी रुपये दिल्याचा दावा एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. सना यांचा हा दावा सीआरपीसी कलम 164 नुसार न्यायदंडाधिकाऱयासमोर नोंदवण्यात आला, जो कोर्टालाही मान्य असेल. मोईन कुरेशीकडून 50 लाख रुपये घेतल्याप्रकरणी सना हे देखील चौकशीच्या घेऱयात होते. या प्रकरणाच्या एसआयटीचं नेतृत्त्व अस्थाना यांच्याकडे होतं. सीबीआयचे विशेष संचालक आणि 1984 च्या बॅचचे गुजरात केडरचे भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी अस्थाना मांस व्यापारी कुरेशीविरोधात सुरु असलेल्या प्रकरणाचा तपास करत आहेत. कुरेशीवर मनी लाँड्रिंग आणि भ्रष्टाचारासह अनेक आरोप आहेत.

Related posts: