|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » पंतप्रधानपदासाठी काँग्रेस राहुल गांधींचे नाव घोषित करणार नाही : पी . चिदंबरम

पंतप्रधानपदासाठी काँग्रेस राहुल गांधींचे नाव घोषित करणार नाही : पी . चिदंबरम 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

2019च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचे नाव पंतप्रधनपदासाठी घोषित करणार नाही, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी दिले आहे. ते म्हणाले, केवळ राहुलचा नाही तर इतर कोणाच्याही नावाचा दावा काँग्रेस पंतप्रधनपदासाठी करणार नाही.

चिदंबरम म्हणाले, आम्ही कधीही म्हटले नाही की राहुल गांधी यांना पंतप्रधन बनवणार आहोत. ज्यावेळी काही काँग्रेस नेत्यांनी अशा प्रकारची मत व्यक्त केली होती, त्यानंतर ऑल इंडिया काँग्रेसने याची दखल घेत अशी विधाने न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. आम्हाला भाजपाला सत्तेतून दूर करायचे आहे. आम्हाला एक पर्यायी सरकार बनवायचे असून हे सरकार पुरोगामी असावे, त्यात व्यक्तिगत स्वातंत्र्याचा सन्मान होईल, टॅक्स टेररिझमला प्रोत्साहन दिले जाणार नाही, महिला आणि मुलांना संरक्षण दिले जाईल तर शेतकऱयांच्या स्थितीत सुधरणा करण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध राहिल.

 

आम्हाला एक अशी आघाडी तयार करायची आहे, ज्यामध्ये पंतप्रधनपदाच्या उमेदवाराचा निर्णय निवडणुकीनंतर सर्व पक्ष एकत्र बसून घेतील. गेल्या दोन दशकांमध्ये राष्ट्रीय पक्षांच्या वोट बँकांमध्ये लुटमार करीत प्रादेशिक पक्ष मजबूत झाले आहेत. भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाचा संयुक्त मतांची भागिदारी 50 टक्क्यांनी कमी झाली आहे. प्रादेशिक पक्षांनी काँग्रेससोबत जाऊ नये यासाठी भाजपा भितीचे वातावरण निर्मितीचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही चिदंबरम यांनी केला आहे.